शेतकरी संघटनेच महावितरण विरोधातले आंदोलन स्थगित
मागील ४ दिवसापासून शेतकरी संघटना तसेच स्वतंत्र भारत पक्षाचे वीज पुरवठा खंडित करण्याची कारवाई बंद करावी यासाठी आंदोलन करत होते. आता हे आंदोलन स्थगित करण्यात आले असले तरी वीज पुरवठा खंडित करण्यास आमचा विरोध कायम राहील असे स्वतंत्र भारत पक्षाचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी सांगितले आहे.
या आंदोलनाची सांगता प्रतिमेचे दहन करून करण्यात आली
वीज पुरवठा खंडित करण्याची कारवाई बंद करावी यासाठी आंदोलन सुरु होते. मात्र आता हे आंदोलन स्थगित करण्यात आले असून या आंदोलनाची सांगता राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उर्जामंत्री नितीन राऊत यांच्या प्रतिमेचे दहन करुन करण्यात आली.
हे ही वाचा (Read This )ड्रोनने शेत फवारणीसाठी मिळणार १० लाखापर्यंत अनुदान
आंदोलन करण्यामागील काय होते करणे ?
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीने वीज पुरवठा खंडित करण्याची कारवाई बंद करावी, वाढीव बिले दुरुस्त करून द्यावीत, शेतीसाठी पूर्ण दाबाने वीज पुरवठा व्हावा व शेतकर्यांवर दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घेण्यात यावेत या मागण्यांसाठी शेतकरी संघटना व स्वतंत्र भारत पक्षाच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू होते. ४ दिवसापासून हे आंदोलन सुरु होते मात्र यावर कोणतीही दखल न घेतल्यामुळे हे आंदोलन स्थगित करण्यात आले आहे.
हे ही वाचा (Read This ) सोयाबीन पिकाला पर्यायी पीक ? ८० दिवसात मिळणार उत्पन्न
आंदोलन संपले तरी विरोध कायम
वीज बिलाची थकबाकी वसूल करण्यासाठी, विज पुरवठा खंडीत करण्याला मात्र विरोध सुरूच राहणार असल्याचे घनवट यांनी सागितले. शासन शेतीमालाचे भाव पाडून शेतकर्यांना उणे अनुदान देते, त्यामुळे शेतकरी सरकारचे देणे लागत नाही. राज्य शासन वीज पुरवठ्यासाठी जितके अनुदान देते तितकीही वीज शेतीसाठी दिली जात नाही, म्हणून शेतकरी वीज वितरण कंपनीचे देणे लागत नाही. शेती पंपांना वाढीव बिले देऊन शेतकरी व राज्य सरकार दोघांनाही वीज वितरण कंपनीने लुटले आहे. सर्व बिले दुरुस्त करण्याची मागणी करण्यात आली होती. शेतकऱ्यांची वीज खंडित करण्यापूर्वी त्यांना १५ दिवसापूर्वी नोटीस पाठवणे गरजेचे असून देखील त्यांना नोटीस न पाठवताच वीज खंडित करण्यात आली आहे.