इतर बातम्या

पाडव्याच्या मुहूर्तावर शेतकऱ्यांसाठी गोड बातमी..!

Shares

खरिप हंगामात अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे पिकाचे मोठे नुकसान झाले होते. यामुळे झालेल्या नुकसानीच्या विम्याचे पैसे देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली होती, परंतू, पीक पाहणी, पंचनामे आणि नंतर दीपावलीमध्ये भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाली होती. या दरम्यान, ७५ टक्केच रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाली होती, आता उर्वरीत रक्कमही शेतकऱ्यांना लवकरच मिळणार अशी माहिती मिळत आहे. मराठवाड्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ही रक्कम मिळाली आहे तर आता नांदेड जिल्ह्यासाठी ३३१ कोटी रुपये मंजूर झाल्याचे प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले आहे.

हे ही वाचा (Read This ) शेतकऱ्यांनो त्वरित करा अर्ज – ३१ मार्च शेवटची तारीख, शेळीपालन,कुक्कुटपालन,शेतमाल आदीसाठी ६०% अनुदान अर्ज

खरिपात पीक अगदी तोंडाशी आला आणि अतिवृष्टीने त्याचे नुकसान झाले. यामुळे शेती पिकाच्या उत्पादनात तर घट झालीच, पण शेतजमिनीही खरडून गेल्याचे प्रकार समोर आले होते. सोयाबीन हे मराठवाड्यातील मुख्य पीक आहे. याच पिकावर शेतकऱ्यांचे अर्थकारण अवलंबून असते. या सततच्या पावसात याच पिकाचे जास्त प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे त्वरीक मदत मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली होती. पण पंचनामे, पीक पीहणी, शेतकऱ्यांने दावे केल्यानंतर पहिल्या टप्प्यात ७५ टक्के निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाला होता. तर उर्वरीत २५ टक्के निधी पुढील टप्प्यात जमा करण्यात येणार असल्याचे राज्य सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले होते.

हे ही वाचा (Read This ) असा काढा घरी बसून जमिनीचा ऑनलाईन नकाशा, महाभूमी अभिलेख

जिल्हाभरातील शेतकऱ्यांना उर्वरीत रकमेचा फायदा व्हावा यासाठी जिल्हा प्रशासनाने वेळोवेळी पाठपुरावा केला होता. खरीप हंगामाचा नैसर्गिक आपत्ती घटका अंतर्गत सुरुवातीला ४६१ कोटींचा पीकविमा मंजूर झाला होता. आता ३३१ कोटी रुपये पिकविम्यासाठी मंजूर झाले आहेत. काही दिवसांमध्येच ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. याकरिता पुन्हा सर्वकाही प्रक्रिया करण्याची गरज भासणार नाही विमा कंपन्याकडून पूर्तता होताच निधीचा लाभ शेतकऱ्यांना होणार आहे.

हे ही वाचा (Read This ) कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी : आता वर्षभर पाण्याचे नो टेन्शन, आलंय नवीन आगळंवेगळं तंत्र

उर्वरीत २५ टक्के रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरवात झाली आहे. मंगळवारी उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम जमा झाली आहे. त्यामुळे खरीप नुकसानीची भरपाई अखेर उशीरा का होईना शेतकऱ्यांना मिळालेली आहे. इतर शेतकऱ्यांनाही याचा लवकरच लाभ मिळेल असे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी सांगितले आहे.

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *