सुगंधित पिकाची लागवड करून कमवा लाखोंचे उत्पन्न
पदार्थाला सुगंध व चव येण्यासाठी विशेष प्रकारच्या सुगंधी रोपाची लागवड केली जाते. त्यांपैकी बऱ्याच वनस्पतींचा वापर औषधांमध्ये देखील केला जातो. वनस्पतीच्या लाकूड, मुळे, साल, पाने, फुले, फळे आदी अवयवांमध्ये सुगंधी सयुंगे असतात. जिरेनियम, मेंथा, खस, लेमन ग्रास, आदी वनस्पती सुगंधित वनस्पतींच्या क्ष्रेणीत येतात. यांचा उपयोग औषधी, साबण, डिटर्जेन्ट पावडर, कॉस्मेटिक्स यांमध्ये होतो. बाजारामध्ये सुगंधित तेल, औषधे यांची मागणी वाढत चालली आहे.आपण आज जाणून घेऊयात सुगंधित शेतीचे फायदे कोणकोणते आहेत.
सुगंधित शेतीचे फायदे-
१. सुगंधित शेती पारंपरिक शेतीच्या तुलनेत दुप्पट उत्पन्न मिळवून देते.
२. गहू , सोयाबीन यांसारख्या पारंपारिक शेतीमधून शेतकरी प्रतिवर्षी ५० ते ६० हजार रुपये प्रतिवर्षी कमावतो तर सुगंधित शेतीमधून प्रतिवर्षी सव्वा ते दीड लाख रुपये कमावतो.
३. सुगंधित पिकावर अतिवृष्टी, दुष्काळ आदी परिस्थितीचा कोणताही परिणाम होत नाही.
४. सुगंधित शेतीमधून रोजगार निर्माण होऊ शकतो.
५. या शेतीसाठी जास्त प्रमाणात पाण्याची आवश्यकता नसते. कमी पाण्यात देखील या पिकाची लागवड करता येते.
६. सुगंधित पिकास मुबलक प्रमाणात मागणी असून त्यास चांगला भाव मिळतो.
या पिकाकडे जास्त लक्ष देण्याची गरज भासत नाही. गेल्या २ दशकांपासून या पिकास मोठ्या प्रमाणात मागणी आहे. सुगंधित पिक चांगले उत्पन्न मिळवून देते.