राज्यस्तरीय राजीव गांधी कृषी रत्न पुरस्कार वितरण संपन्न
कृषी क्षेत्रातील अत्यंत प्रतिष्ठेचा समजला जाणारा २०२२ चा राज्यस्तरीय राजीव गांधी कृषी रत्न पुरस्कार या वर्षी कृषी विज्ञान केंद्र, घातखेड अमरावती येथील संपर्क शेतकरी मिलिंद गोदे सावळापूर, ता. अचलपूर यांना उत्कृष्ठ सेंद्रिय शेती व कृषी तंत्रज्ञान प्रसारक म्हणून कार्य केल्या बद्दल मुंबई येथे प्रदान करण्यात आला. कृषी क्षेत्रा मध्ये उल्लेखनीय कार्य करणा-याच्या पाठीवर कौतुकाची थाप देणारा राजीव गांधी कृषि रत्न पुरस्कार राजीव गांधी यांच्या स्मुर्ती दीनी दिनांक २१ मे २०२२ रोजी मुंबई येथील यशवंतराव चव्हान प्रतिष्ठान मध्ये आयोजित या समारंभाच्या अध्यक्षस्थानी कॉंग्रेसचे जेष्ठ नेते माणिकराव ठाकरे होते.
खरीप हंगामात जास्तीत जास्त उत्पादन घ्यायचे असेल तर हे सोपे काम मे महिन्यात नक्की करा
पुरस्काराचे हे अविरत १६ वे वर्ष असून यावेळी राजीव गांधी कृषि प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रकाश साबळे, निवड समितीच्या अध्यक्षा पूर्णिमा सवाई तसेच सदस्य अशोक मोरे, भैयासाहेब निचळ , प्रा. दिलीप काळे , कृषी विज्ञान केंद्राचे प्रा. अमर तायडे, प्रादेशिक संशोधन केंद्र सोयाबीन अमरावतीचे प्रा. हेमंत डिके , विलास सवाणे आदी मान्यवर उपस्थित होते . या प्रसंगी राज्यातील कानाकोप-यातील कृषि क्षेत्रातील २६ प्रगतीशील शेतक-यांसह उत्कृष्ट तिफनकरी , कृषि पत्रकार, कृषी मित्र, कृषि व पशु वैज्ञानिक, महिला शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपनी याना राजीव गांधी कृषी विज्ञान प्रतिष्ठान तर्फे राज्य स्तरीय राजीव गांधी कृषी रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
महाराष्ट्र मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना 2022: ऑनलाइन नवीन अर्ज असा करा
मिलिंद गोदे आपल्या शेतामध्ये सेंद्रिय शेतीचे पीक प्रात्यक्षिक केली, सेंद्रिय शेती प्रमाणीकरण करून परंपरागत सेंद्रिय शेती ही योजना गावात राबविले. त्याच बरोबर शेतकरी यांची शेती शाळा या माध्यमातून नविन पेरणी पद्धती अवगत करून दिली. याबद्दल आपल्याला कृषी विभाग अचलपूर यांनी सन्मानित केले.
(नोंदणी) नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना 2022: नवीन ऑनलाइन अर्ज, संपूर्ण माहिती
कृषी विज्ञान केंद्र घातखेड यांच्या सोबत राहून यशस्वी मुग या पिकाचं बिजोत्पादन प्रात्यक्षिक राबविले.कृषी तंत्रज्ञान व व्यवस्थापन यंत्रणा आत्मा व कृषी विज्ञान केंद्र घातखेड अमरावती यांनी ही पुरस्कार देऊन गौरविले. त्याच बरोबर कृषी विषयक 70ते ८० लेख गुगल या सोशल मीडिया माध्यमाच्याआधारे कृषी क्षेत्रातील माहिती शेतकरी यांच्या पर्यंत पोहचवली व महाराष्ट्र व मध्य प्रदेश मधील शेतकरी आपल्या संपर्कात आहेत.त्याच बरोबर आपले शेती ला अनुसरून 6जोड व्यवसाय सुरू केली.