अखेर सोयाबीन ८ हजारावर पोहचला !
सोयाबीनच्या दरात सतत चढ उतार होत असतांना आता सोयाबीनच्या दराने ८ हजारांचा पल्ला गाठला असून लवकरच १० हजारांवर पोचण्याची अपेक्षा शेतकरी करत आहेत.
अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पिवळ्या सोन्याला चकाकी आली असे म्हणता येईल, बुधवारी सोयाबीनला ८ हजारांपेक्षा जास्त भाव मिळाला असून सोयाबीनची आवक तेजीत सुरु आहे.
अकोला बाजार समितीमध्ये बुधवारी एका दिवसात २ हजार २४० क्विंटल आवक झाली तर मागील २ दिवसात सोयाबीनच्या दरात १ हजार रुपयांची वाढ झाली.
सोयाबीनला सुरुवातीला मागील ५० वर्षातील सर्वात विक्रमी दर मिळाला होता. मात्र नंतर आवक वाढताच दरात घसरण सुरु झाली ते ५ हजारांवर येऊन थांबली होती. त्यानंतर सोयाबीन शेतकरी उत्पादकांनी सोयाबीन साठवणुकीवर जास्त भर देण्यास सुरुवात केली. परिणामी सोयाबीनचे दर हे ५ हजार ९०० ते ६ हजार १०० वर स्थिर झाले होते.
हे ही वाचा (Read This ) खाद्यतेलाच्या किंमती अधिक वाढण्याची शक्यता, पाम तेलाला मिळतोय शेंगदाणा तेलाचा भाव
सोयाबीनचे दर
या पिकाची लागवड करून ९० ते १०० दिवसांमध्ये व्हा मालामाल
हे ही वाचा (Read This ) या पिकाची लागवड करून ९० ते १०० दिवसांमध्ये व्हा मालामाल
सोयाबीनचे दर अजून वाढणार ?
परंतु आता युक्रेन- रशिया या २ देशांमध्ये होत असलेल्या युद्धाचा परिणाम शेतमालाच्या किमतींवर होतांना दिसून येत. तेलाच्या किमतीमध्ये देखील मोठ्या प्रमाणात अचानक वाढ होत आहे.
युद्धाचा काळ वाढला तर सोयाबीनच्या दरात अधिक वाढ होणार असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
युक्रेन-रशिया युद्ध फार काळ चालले तर गोडेतेलाचे भाव भडकणार आहेत. त्यामुळे सोयाबीनचे मार्केट आणखी वाढेल असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे व्यापारी चढ्या दराने सोयाबीनची मागणी करीत आहेत. भावात चढ उतार होताना दिसत आहे.