आता अमीर खान शिकवणार सोयाबीन पेरणी, घेणार ऑनलाईन शाळा
सोयाबीन हे महाराष्ट्रातील मुख्य पीक असून यंदा सोयाबीन क्षेत्रात वाढ झाली असली असली उत्पादन मात्र अपेक्षेप्रमाणे मिळत नाहीये. तर सोयाबीनचा उतारा हा एकरी ५ ते ६ क्विंटल एवढाच आहे.
अमीर खानने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची सोयाबीन शाळा घेतली आहे. दर रविवारी ऑनलाईनच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सोयाबीन पेरणी पासून ते बाजारपेठेपर्यंतचे मार्गदर्शन केले जात होते. याच अनुशंगाने अभिनेता अमिर खान याने राज्य कृषिमंत्री दादा भुसे यांची भेट घेतली.
हे ही वाचा (Read This ) आताची UPDATE सोयाबीनचे दर ‘मैं झुकेगा नही ‘ आतापर्यंचा उचांकी भाव !
आतापर्यंत महाराष्ट्रात पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून जलसंधारणाची अनेक कामे झाली असून आता या टीमच्या निदर्शनास आले की सोयाबीनचे हे मुख्य पीक असूनही त्याची उत्पादकता मुबलक प्रमाणात होत नाहीये. या अनुशंगाने राज्यातील कृषी विद्यापीठातील संशोधकांशी चर्चा आणि प्रत्यक्ष बांधावरची स्थिती काय आहे पाहून या पाणी फाऊंडेशनच्यावतीने एक पुस्तक प्रकाशित करण्यात आले असून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे.
हे ही वाचा (Read This ) PM Kisan सन्मान निधी योजनेत २ महत्वाचे बदल, होळीनंतर जमा होणार ११ वा हफ्ता
दादाजी भुसे यांच्या हस्ते होणार सोयाबीन पुस्तकाचे प्रकाशन
महाराष्ट्रात सोयाबीनचे क्षेत्र वाढले असले तरी त्याचे उत्पादन मिळवण्यास काही अडचणी येत आहेत. सोयाबीन हे खरीप हंगामातील मुख्य पीक असून यावर अनेकांचे आर्थिक गणित अवलंबून आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन मिळावे म्हणून सोयाबीन पुस्तक कृषिमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात येणार आहे.