सोयाबीनने वाढवली शेतकऱ्यांची चिंता !
बाजारपेठेतील सोयाबीनचे चित्र अतिशय चिंतकारक आहे. याचे कारण म्हणजे सोयापेंड आयातीस पूर्णविराम देण्यात आलेला आहे. त्यातही सोयाबीनच्या दरात घसरण होत आहे. गेल्या काही दिवसांपासून सोयाबीनचा भाव हा स्थिर होता परंतु आता भावात घसरण झाली आहे. त्यामुळे आधीपासूनच संकटात असलेला शेतकरी अजून चिंतेत पडला आहे.
शेतकरी सोयाबीनचे दर वाढेल या आशेवर होता. दिवाळी नंतर सोयाबीनच्या भावात २ हजार रुपयांनी वाढ झाली होती. त्यानंतर शेतकऱ्यांच्या भाव वाढीच्या अजून अपेक्षा होत्या. परंतु सोयाबीनचा निर्णय न लागल्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीनची आवक करण्याचा निर्णय घेतला होता. आता मात्र सोयाबीन आयातीस पूर्णविराम देण्यात आला असून सोयाबीन दरात घसरण होतांना दिसून येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांपुढे आता मोठा प्रश्न उभा राहिला आहे.
सोयाबीनचे भविष्य काय असणार ?
आता पर्यंत सर्वांना वाटत होते सोयाबीनच्या दरात वाढ होईल. परंतु सर्व या उलट झाले. याचे मुख्य कारण म्हणजे सोयपेंड आयातीस स्थागिती देण्यात आली आहे. सोयाबीनचा दिवसेंदिवस घसरता दर पाहता सोयाबीन भविष्यात संकटात सापडणार आहे. गेल्या १५ दिवसांमध्ये सोयाबीन दरात ६०० रुपयांची घसरण झाली आहे. हा दर भविष्यात राहील की यात अजून घसरण होईल या भीतीने शेतकरी सोयाबीन विक्रीवर जास्त भर देत आहे.
सोयाबीन मागणीत घट मात्र क्षेत्र वाढले –
उन्हाळी हंगामात देखील सोयाबीनचे पीक घेतले जात आहे. आता पर्यंत उन्हाळी हंगामात बीजोत्पादनाचा प्रयोग केला जात होता. मात्र आता रब्बी हंगामातील लांबलेल्या पेरण्या , पाण्याची उपलब्धता यामुळे उन्हाळी हंगामात सोयाबीनवर भर दिला जात आहे. सोयाबीनच्या दरात वाढ झाली असतांना अधिक उत्पादनावर शेतकरी भर देत होता. परंतु सध्या स्थिती पूर्णपणे बदललेली आहे. सोयाबीनच्या दरात दिवसेंदिवस घसरण होत आहे. सोयाबीनच्या मागणीत घट झाली असून सोयाबीन आवक वाढली आहे.
सोयाबीनचे भवितव्य काय असेल हे कोणालाही सांगता येणार नाही. त्यामुळे शेतकरी सोयाबीन विक्रीवर भर देत आहे.