मागील १० दिवसाच्या चढ-उतारीनंतर सोयाबीनच्या दरात स्थिरता
मागील काही दिवसांपासून सोयाबीनच्या दरामध्ये सतत चढ उतार होत आहे. मात्र आता सोयाबीनचे दर हे ७ हजार ३०० ते ७ हजार ४०० वर स्थिर झाले आहेत. एवढेच काय तर सध्या सोयाबीनच्या अवकमध्ये वाढ होऊन देखील दर हे स्थिरच आहेत.
बाजारपेठेमध्ये सोयाबीनची मागणी वाढल्यामुळे इतक्या दिवसापासून साठवणूक करून ठेवलेला सोयाबीन आता बाजारामध्ये दाखल होत आहे.
सोयाबीनचे आजचे दर
शेतकऱ्यांना सोयाबीनच्या वाढीव दराची अपेक्षा आहे. मात्र सध्या दर स्थिर असल्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीचा वेग थोडा वाढवला आहे.
उन्हाळी सोयाबीन उत्पादक चिंतेत …
सध्या सोयाबीनला बाजारात चांगला भाव मिळत असल्याने बहुतांश शेतकऱ्यांनी कपाशी उपटून सोयाबीनची लागवड केली आहे. हवामान बदलामुळे या पिकाला पाहिजे तशी फुले येत नसल्यामुळे शेतकऱ्याच्या चिंतेत भर पडली आहे.
शेतकऱ्यांच्या उत्पनात वाढ व्हावी तसेच खरिपात त्यांना बियाण्याची कमतरता भासू नये यासाठी उन्हाळी सोयाबीनची मोठ्याप्रमाणात लागवड व्हावी म्हणून कृषी विभागाला विशेष लक्ष देण्यासाठी पालकमंत्र्यांनी सूचना दिल्या होत्या.
जिल्ह्यातील ८ तालुक्यांपैकी ६ तालुक्यामध्ये ४४९ हेक्टर वर उन्हाळी सोयाबीनची लागवड झाली आहे. किमान ९०९ हेक्टर सोयाबीनची लागवड होईल अशी अपेक्षा कृषी विभागला होती. मात्र सोयाबीन पिकाला पाहिजे तशी फुलेच येत नसल्याने शेतकऱ्यांना चिंता होत आहे.
सोयाबीन आवक वाढली
सोयाबीनच्या दरामध्ये सतत चढ उतार सुरु असून शेतकरी प्रश्नात पडला आहे. मध्यंतरी सोयाबीनच्या दरात ४०० रुपयांनी वाढ झाली होती. तर नंतर १५० रुपयांनी घसरण झाली होती.
सोयाबीनच्या दरामध्ये अनेकदा वाढ होऊन देखील आवक मात्र स्थिरच होती. आता मात्र मोठ्या प्रमाणात आवक होतानाचे चित्र दिसत आहे.