सोयाबीनचे दर स्थिर, आता निर्णय शेतकऱ्यांचा
सध्या सोयाबीन अंतिम टप्यात असला तरी सर्व बाजारपेठेमध्ये सोयाबीनचीच चर्चा होत आहे. याचे कारण म्हणजे सोयाबीनच्या दरामध्ये सतत होताना बदल .
मागील काही दिवसांपासूनसोयाबीनच्या दरामध्ये सतत चढ उतार होत असल्यामुळे शेतकरी संभ्रमात होता. मात्र आता दर स्थिरावले आहेत.
गेल्या आठवड्यात सोयाबीनच्या दरामध्ये सातत्याने घसरण होत होती मात्र त्यानंतर एका दिवसातच दरामध्ये अचानक सुधारणा झाली. याचे कारण म्हणजे रशिया – युक्रेन यांच्यामध्ये सुरु असलेले युद्ध.
दरात वाढ होण्यास सुरुवात झाल्यानंतर सर्वांना वाटले आता दर ८ हजार पार करणार मात्र आत आहे दर २ दिवसांपासून ७ हजार ३५० ते ७ हजार ४०० वर स्थिरावले आहेत.
सोयाबीनचे आजचे दर
सोयाबीनच्या दराचा आवकावर काय परिणाम होईल ?
सोयाबीनच्या दरामध्ये सतत होत असणाऱ्या चढ उतार मुळे सोयाबीनची साठवणूक करावी की विक्री असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला होता. मात्र मागील २ दिवसांपासून सोयाबीनच्या दरात स्थिरता पाहायला मिळत असून आता दर असेच राहिले तर आवकामधे वाढ होईल असा अंदाज व्यापारी अग्रवाल व्यक्त करत आहेत.
मात्र यावर आता शेतकऱ्यांची भूमिका काय असेल हे महत्वाचे आहे.
अजूनही अनेक शेतकऱ्यांकडे सॊयाबीनचा मोठ्या प्रमाणात साठा केलेला आहे
यंदा सोयाबीन उत्पादन कमी प्रमाणात झाले असून सोयाबीनच्या पिकाचे व्यवस्थापन करण्यासाठी अधिकच खर्च आला आहे.
त्यात सोयाबीनचे दर हे सुरूवातीपासूनच अपेक्षेप्रमाणे नसल्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीन साठवणुकीचा निर्णय घेतला होता. तर सुरुवातीला सोयाबीनला ४ हजार ८०० ते ५ हजार असा दर मिळत होता. त्यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सोयाबीन साठवणूक करून ठेवली होती.
आता मात्र सोयाबीन दराचे चित्र बदलले आहे. त्यामुळे शेतकरी आता सोयाबीनची साठवणूक करतो की विक्री हे पाहण्यासारखे आहे. आता सर्व शेतकऱ्यांवर अवलंबून आहे.