२ दिवस बाजार समित्या बंदमुळे सोयाबीनच्या दरात चढ-उतार, भाव ७,७०० पर्यंत
सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे संपूर्ण हंगाम चिंतेत गेले तर हंगामाच्या शेवटीला सोयाबीनच्या दरात वाढ झाल्यामुळे शेतकरी थोडा सुखावला होता मात्र युक्रेन – रशिया युद्धामुळे आता सर्व चित्र बदलतांना दिसत आहे.
मागील आठवड्यात शेवटच्या दिवशी सोयाबीनच्या दरात घट झाली होती. मात्र त्यानंतर सोमवारी लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनला ७ हजार २०० असा दर मिळाला होता. तर त्यानंतर सलग २ दिवस बाजार समितीमधील व्यवहार बंद राहिले होते.
सोयाबीनच्या मागणीमध्ये वाढ झाल्यामुळे दरामध्ये वाढ होत असून रशियातून होणाऱ्या तेलाच्या आयातीवर युध्दजन परस्थितीचा परिणाम होतांना दिसत आहे.
सोयाबीनचे दर
२ दिवस बाजार समित्या बंद असल्याचा परिणाम ?
मागील २ दिवसांपासून बाजार समित्या बंद असल्यामुळे गुरुवारी सोयाबीनची मोठ्या प्रमाणात आवक होण्याची शक्यता आहे. आवक मोठ्या प्रमाणात झाली तर त्याचा सोयाबीनच्या दरावर काय परिणाम होईल सांगता येत नाही.
यापूर्वी ५ हजार दरही शेतकऱ्यांसाठी माफक होता पण यंदा उत्पादनात झालेली घट आणि आता वाढती मागणी त्यात आंतराष्ट्रीय पातळीवरील घटना यामुळे दरात वाढ होत आहे. सोयाबीनला ७ हजार ५०० हा दर चांगला असून शेतकऱ्यांनी विक्रीबाबत निर्णय घेण्यास हरकत नसल्याचा सल्ला व्यापारी अशोक अग्रवाल यांनी दिला आहे.
यंदा भारताबरोबर इतर देशातदेखील सोयाबीनचे उत्पादन कमी प्रमाणात झाले आहे. तर दुसरीकडे युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्धामुळे सोयाबीन निर्यातीवर निर्बंध आले आहेत.
तर चीनमध्ये सोयाबीनची टंचाई निर्माण झाली आहे. यंदा उत्पादन कमी झाल्यामुळे दरात वाढ होतांना दिसून येत आहे. हंगामाच्या अंतिम टप्यात का होईना सोयाबीनच्या दरात वाढ झाली आहे. या संयमाचे फळ आता शेतकऱ्यांना मिळतांना दिसत आहे.