आनंदाची बातमी , सोयाबीनच्या दरात वाढ !
सॊयाबीनची चर्चा अजूनही काही संपण्याचे नाव घेत नाहीये. सरकारचा निर्णय आणि शेतकऱ्यांनी केलेली साठवणूक यामुळे सोयाबीन दरात उतार होतांना दिसून येत आहे . परंतु आज सोयाबीन दरात २०० रुपयांनीं वाढ झालेली दिसून येत आहे. शेतकऱ्यांना आता बाजारपेठेचा संपूर्ण अभ्यास करणे गरजेचे ठरलेलं आहे.शेतकऱ्यांनी अगदीच हंगामाच्या सुरुवातीपासूनच सोयाबीन साठवणूक करण्यास सुरुवात केली होती. काही काळानंतर त्यांनी टप्याटप्याने सोयाबीन विक्रीस सुरुवात केली मात्र तरीही त्यांना अपेक्षेप्रमाणे दर मिळाला नाही. सतत सोयाबीन दरात घसरण होतांना दिसून येत होती. मात्र आता हे चित्र बदलेल आहे आता २०० रुपयांनीं वाढ झाली आहे.
वायद्या बंदीनंतर बदलली का स्थिती ?
शेतकऱ्यांना शेतमालाचा भविष्यात काय दर असेल याच अंदाज काढता येत नाहीये. कारण सोयाबीनसह अजून ८ शेतीमालावर वायदे बंदी करण्यात आली आहे. सध्या बाजारातील शेतमालाची स्थिती बदलतांना दिसून येत आहे. त्यामुळे खरेदी – विक्री यांचा अभ्यास बारकाईने करणे गरजेचे आहे. वायदे बंदी झाल्यावर देखील शेतकऱ्यांनी टप्याटप्याने सोयाबीनची आवक सुरु ठेवली आहे.
शेतकऱ्यांना अजूनही कसली भीती आहे ?
शेतकऱ्यांनी सुरवातीपासूनच सोयाबीन टप्याटप्याने विक्रीसाठी काढले आहे. सोयाबीनला अनेक दिवसांपासून अपेक्षेप्रमाणे दर मिळत नव्हते. मात्र आता दरात थोडी वाढ झाली आहे तरीही शेतकरी टप्याटप्यानेच सोयाबीन विक्रीस काढत आहे. याचे कारण म्हणजे दर वाढले म्हणून सोयाबीन जास्त प्रमाणात विक्रीस काढला तर दरात पुन्हा घसरण होण्याची भीती शेतकऱ्यांना आहे.
साठवलेल्या सोयाबीनचा दर्जा
सोयाबीनला दर कमी जरी मिळत असला तरी सोयाबीनचे भविष्यात होणारे नुकसान हे टळलेले आहे. दर वाढीच्या अपेक्षेने शेतकऱ्यांनी सॊयबीन साठवणूक करून ठेवली होती. आता दर थोडा चांगला मिळत आहे. साठवून ठेवलेला सोयाबीन मधील आद्रता आता कमी झाली आहे त्यामुळे साठवून ठेवलेला सोयाबीन चा दर्जा हा चांगला आहे.