सोयाबीनची दर चिंताजनक,आवक वाढतेय शेतकऱ्यांसाठी काय आहे सल्ला ?
मागील दोन महिन्यांपासून सोयाबीनच्या दारात होत असलेली वाढ पाहता शेतकऱ्यांनी साठवणुकीवर भर दिला होता. अपेक्षा होती की सोयाबीनला जवळपास ८,००० ते १०,०० भाव मिळू शकेल. त्यामुळे शेतकरी वर्ग हा सोयाबीनच्या विक्रीला तयार नव्हता. बाजारातील सध्याची स्थिती बघता सोयाबीनची आवक वाढत आहे. तरीही दर काही वाढलेले बघायला मिळत नाही आहेत. यामुळे शेतकरीवर्ग विक्री करावी की नाही या संकोचात असलेला बघायला मिळत आहे. शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये आणि त्यांना फायदा करून घेता यावा यासाठी त्यांनी स्वतःच्या नियोजनानुसार टप्या-टप्याने विक्री करण्याचा सल्ला कृषितज्ज्ञ देत आहेत. अस्थिर असणाऱ्या सोयाबीनच्या बाजारात मागील काळात सोयपेंड आयातीची चर्चा सुरु होती अस असतानासुद्धा सोयाबीनच्या दरात वाढ होत होती.
सोयाबीनचे दर 6 हजारापर्यंतच तरीही वाढतेय आवक
15 दिवसांपूर्वी सोयाबीनचे दर हे 6 हजार 600 वर गेले होते. दरम्यान, सोयापेंड आयातीची चर्चा ही सुरुच होती. त्यामुळे सोयापेंड आयातीला ‘ब्रेक’ लागल्यानंतर आता पुन्हा दरात वाढ होईल अशी अपेक्षा होती पण झाले उलटेच. सोयाबीनचे दर हे घटत आहेत तर आवक वाढत आहे. लातूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी 14 हजार पोत्यांची आवक झाली होती तर सरासरी दर हा 6 हजार 100 रुपये होता.
शेतकऱ्यांना नक्की कशाची आहे धाकधूक ?
आगामी काळात सोयाबीनच्या दरात वाढ होणार असा विश्वास शेतकऱ्यांना दोन महिन्यांपासून होता. पण आता बाजारातील चित्र पाहून शेतकरी आता चिंतीत झाले आहेत, कारण सध्या सर्व सुरळीत चालू असताना जर सोयाबीनचे दर वाढत नसतील तर येत्या काळात उन्हाळी सोयाबीन बाजारात आल्यावर या साठवणूक केलेल्या सोयाबीनचे काय करायचे हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. आता सोयाबीन नक्की कुठे झेप घेणार हे येणारा काळच सांगू शकतो.
ब्युरो रिपोर्ट – किसानराज डेस्क