वायदे बाजारामध्ये बंदीमुळे सोयाबीनचे दर घटले, शेतकरी संभ्रमात !
सोयाबीनची चर्चा काही संपण्याचे नावाचं घेत नाहीये. गेल्या अनेक दिवसांपासून सोयाबीनच्या दरात चढ-उतार होतांना दिसून येत होते. मात्र काही दिवसांपूर्वी या दरात स्थिरता दिसून आली आहे. शेतकऱ्यांना दर वाढीची अपेक्षा होती मात्र त्यांच्या अपेक्षेवर पाणी फेरले आहे, असे म्हणता येईल. कारण बाजारपेठेत दर कमी तर आवक जास्त प्रमाणात होत होती. त्यामुळे केंद्र सरकारने आता वायदा बंदीचा निर्णय घेतला आहे. यामुळे सोयाबीनचे दर अधिक कमी होण्याचे चित्र दिसून येत आहे.
सोयाबीनच्या दराची सध्या काय आहे परिस्थिती ?
डिसेंबर महिन्यात हा दर कमी अधिक होत आता चक्क ६बी हजारावर येऊन थांबला आहे. आता तर वायद्याला बंदी घालण्यात आल्याने शेतकऱ्यांनी साठवलेल्या सोयाबीनचे काय असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. हंगामाच्या सुरवातीपासूनच शेतकऱ्यांनी समजदारीने निर्णय घेतल्यामुळेच सोयाबीनचे दर हे थोडे टिकून आहेत. आतापर्यंत सोयाबीनची आवक मोठ्या प्रमाणात वाढूच दिली नसल्याने दर हे एकतर स्थिर राहिले होते. त्यामध्ये वाढ झाली होती. त्यामुळेच दिवाळीनंतर 2 हजाराने सोयाबीन वाढले होते. आता वायदे बंद होऊन जर आवक वाढली तर मात्र, त्याचा सोयाबीनच्या दरावर परिणाम होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीनची आवक मर्यादितच ठेऊन दर कायम ठेवावे लागणार आहेत. दर वाढीच्या प्रतिक्षेत शेतकऱ्यांनी आतापर्यंत साठवणूक केली होती. पण आता आहे ते दर कायम रहावे याकरिताही टप्प्याटप्प्याने सोयाबीनची विक्री करणे गरजेचे आहे असे निदर्शनात येत आहे.
सध्या कसे आहेत सध्या इतर शेतमालाचे भाव ?
लातूर येथे दुपारी १२ च्या दरम्यान शेतमालाचा सौदा होत असतो. सोमवारी लाल तूर- ६१८० रुपये क्विंटल, पांढरी तूर ५८०० रुपये क्विंटल, पिंकू तूर ६१०० रुपये क्विंटल, जानकी चना भाव ४८५० रुपये क्विंटल, विजय चना भाव ४८५०, चना मिल ४७००, सोयाबीन ६१५८, चमकी मूग भाव ७१५०, मिल मूग ६०५० तर उडीदाचा भाव ७२०० असा होता.