ढोबळी (शिमला) मिरची लागवड तंत्रज्ञान
ढोबळी मिरचीचा वापर भाजी व्यतिरिक्त देखील केला जातो. ढोबळी मिरचीची चव त्याच्या कॅपीसीनच्या प्रमाणावर अवलंबून असते. महाराष्ट्रात ढोबळी मिरची परिपक्व झाल्यानंतरही त्याचा रंग हिरवा असतो. ढोबळी मिरचीचा वापर विविध पदार्थांमध्ये केला जातो. आपण ढोबळी मिरची लागवड पद्धत जाणून घेणार आहोत.
जमीन व हवामान –
१. ढोबळी मिरचीच्या पिकासाठी चांगली कसदार व सुपीक जमिनीची निवडावीत.
२. मध्यम ते भारी काळ्या जमिनीत हे पीक उत्तम येते.
३. नदी काठच्या पोयट्याच्या जमिनीत देखील हे पीक उत्तम येते.
४. या पिकाच्या लागवडीसाठी जमिनीचा सामू ६ ते ७ च्या दरम्यान असला पाहिजे.
५. ढोबळी मिरचीच्या वाढीसाठी सरासरी तापमान २५ सेल्सिअस असावे.
६. ढोबळ्या मिरचीची लागवड ऑगस्ट – सप्टेंबर महिन्यात करावीत. फळांची काढणी जानेवारी – फेब्रुवारी महिन्याच्या कालावधीत करता येते.
पूर्वमशागत –
१. जमिनीची उभी आडवी नांगरणी करून घ्यावी.
२. मातीत हेक्टरी १५ ते २० टन शेणखत मिसळावेत.
३. पूर्वीच्या पिकाचे धसकटे गोळा करून घ्यावे.
४. दोन कुळव्याच्या पाळ्या पाळ्या द्याव्यात.
बियाणे –
प्रति हेक्टरी ३ किलो बियाणे लागतात.
लागवड –
१. रोपे लागवड करण्यापूर्वी जमीन चांगली नांगरून घ्यावी.
२. गाडी वाफ़े तयार करून त्यावर चांगले कुजलेले शेणखत टाकावेत.
३. बियाण्यांची चांगली वाढ व्हावी यासाठी वाफ्याच्या झारीने हलकेसे पाणी द्यावे.
४. पुर्नलागवड करायची असल्यास ६० सेमी अंतराने सऱ्या काढ्याव्यात.
५. पुर्नलागवड शक्यतो दुपारी ४ नंतर करावी. त्यानंतर त्वरित त्यास पाणी द्यावे.
पाणी व्यवस्थापन –
१. ढोबळी मिरचीस लागवड केल्यापासून त्याच्या उत्तम वाढीसाठी सुरवातीपासूनच भरपूर प्रमाणात नियमित पाणी द्यावे.
२. फुले व फळे लागण्यास सुरुवात झाल्यास नियमितपणे गरजेनुसार पाणी द्यावे.
३. शक्यतो १ आठवड्याने या पिकास पाणी द्यावे.
आंतरमशागत –
१. मिरचीचा मळा नेहमी स्वछ ठेवावा. जेणेकरून पीक रोगास बळी पडणार नाही.
२. सुरवातीच्या काळात गरजेप्रमाणे २ ते ३ वेळेस निंदणी करावी.
३. झाडांना मातीचा भक्कम आधार द्यावा.
काढणी –
१. फळे संपूर्ण वाळलेली , हिरवीगार असल्यास त्यांची काढणी करावी. फळे झाडावर जास्त काळ असल्यास ती पिकतात.
२. ढोबळी मिरचीच्या हिरव्या फळाबरोबर लाल फळास देखील अनेक देशात मागणी आहे.
३. फळे काढतांना देठासोबत काढावेत.
४. दार ८ ते ९ दिवसांनी फळांची काढणी करावीत.
उत्पादन –
ढोबळी मिरचीचे सरासरी प्रति हेक्टरी १७ ते २० टन पर्यंत उत्पादन मिळते.
ढोबळी मिरचीची मागणी भारताबरोबर अनेक देशात आहे. त्यामुळे ढोबळी मिरचीचे पीक घेणे नेहमी फायदेशीर ठरते. या पिकाची लागवड करण्यापूर्वी माती परीक्षण करणे गरजेचे आहे.