पशुधन

शेतकऱ्यांना जास्तीत जास्त फायदा करून देणारं बदक पालन

Shares

बरेच शेतकरी शेती बरोबर जोडधंदा म्हणून पशुपालन करत असतात. पशुपालनामध्ये बदकपालन भरघोस उत्पन्न मिळवून देणारे आहे. बदकपालनासाठी खर्च आणि वेळ कमी लागतो.आपण आज बदकपालनाचे फायदे जाणून घेणार आहोत .

बदकाबद्दल माहिती –
१. बदके ६ महिने झाले की अंडी देण्यास सुरुवात करतात .
२. त्यांच्या अंड्यांचे वजन ६५ ते ७० ग्रॅम पर्यंत असते.
३. बदके वर्षाला ३०० ते ३२० अंडे घालतात.
४. बदकांचे वजन ४० व्या आठवड्यात १.५ ते २ किलो असते.
५. बदकांचा मृत्य दर हा २.५ % आहे. प्रौढ बदकांचा दरवर्षी ५% ते ६% आहे.

बदकपालनाचे फायदे –
१. बदकपालन खूप कमी खर्चात करता येते.
२. बदकपालनासाठी भांडवल कमी लागते आणि नफा जास्त होतो.
३. ६ महिन्यांतच बदक अंडे देण्यास सक्षम होतात .
४. बदकाचे एक अंडे ८ ते १० रुपयांपर्यंत विकले जाते.
५. १० मादी बदकासाठी एक नर ठेवला तरी चालते .
६. बदकाचे अंडेच नाही तर मांस देखील उत्पन्नासाठी उत्तम मार्ग आहे .
७. कोंबड्यांपेक्षा बदकांमध्ये रोगप्रतिकार शक्ती जास्त असते.

बदकपालनासाठी काही आवश्यक गोष्टी –
१. बदकपालनासाठी आपल्या जवळपास पाण्याचा स्रोत असणे अत्यंत गरजेचे आहे.
२. पाण्याचा स्रोत जवळ असेल तर बदके सहजपणे प्रजनन करू शकता आणि अंडी देखील देऊ शकतात .
३. जर आसपास पाण्याचा स्रोत नसेल तर तुम्ही कृत्रिम तलाव बनवू शकता .
४. बदक जर आजारी पडले तर त्यांना त्वरित वेगळे केले गेले पाहिजे.
५. बदकांची खरेदी चांगल्या आणि स्वछ नर्सरीतून करा .
६. मृत बदकांना जाळून किंवा पुरून टाका.
७. बदकांच्या पिल्लांवर जास्त लक्ष दिले गेले पाहिजेत.

बदकांच्या काही महत्वाच्या जाती –
१. व्हाईट पॅकिंग, एलिसबरी, मस्कोवी, राऊन, आर्फिंग्टन, स्वीडन, पेकिंग बदकांच्या या जाती मांस उत्पादन करण्यासाठी उपयुक्त ठरतात .
२. इंडियन रनर ही जाती अंडीसाठी उत्कृष्ट आहे.
३. खाकी कॅम्पबेल प्रजाती ही मांस आणि अंडी दोन्हीसाठी उत्कृष्ट आहे.

बदकपालन हा अत्यंत फायदेशीर असा व्यवसाय असून यात उत्पादन आणि उत्पन्न दोन्ही जास्त प्रमाणात होतो . हा व्यवसाय अंडे आणि मांस दोन्ही स्वरूपात फायदेशीर ठरू शकतो.

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *