शेतकऱ्यांसाठी फायद्याची PM किसान FPO योजना !
शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यासाठी आणि आर्थिक विकास व्हावा या उद्देशाने केंद्र सरकार वेगवेगळ्या योजना राबवत असते.
यातीलच एक योजना म्हणजे पी. एम. किसान एफ. पी. ओ. योजना.
- नक्की काय आहे ही योजना?
केंद्र सरकारने सुरु केलेल्या पी. एम. किसान एफ.पी.ओ. योजनेच्या माध्यमातून शेतकरी उत्पादक कंपनीला म्हणजे ‘फार्मर्स प्रोड्युसर ऑर्गनायझेशन’ ला १५ लाख रुपये दिले जातात. या योजनेचा लाभ मिळविण्यासाठी 11 शेतकऱ्यांनी एकत्र मिळून एक कंपनी बनवावी लागते. मग या कंपनीला व शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा हा कृषी संबंधित उपकरणे, फर्टिलायझर्स, विज किंवा औषध खरेदीसाठी होतो. - कसा मिळेल लाभ?
पी. एम. किसान एफ. पी. ओ. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना थोडी वाट पाहावी लागणार आहे. कारण सरकारने अजून या योजनेचीनोंदणी प्रक्रिया सुरू केलेली नाही. माध्यमांच्या रिपोर्ट प्रमाणे सरकार लवकरच या योजनेसंबंधी पुढील अधिसूचना जारी करणार आहे. त्यामुळे या योजनेची पूर्वतयारी शेतकऱ्यांनी करून ठेवली तर लवकरच सुरु होणाऱ्या या योजनेचा लाभ घेणे सोपे होईल हे निश्चित. - व्हिडिओ स्वरूपात पाहण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा