‘सियाम’च्या अध्यक्षपदी अजित सिड्सचे व्यवस्थापकीय संचालक समीर मुळे यांची निवड
सिड इंडस्ट्रीज असोसिएशन ऑफ महाराष्ट्र (सियाम) ची नववी वार्षिक सर्वसाधारण सभा औरंगाबाद येथे दि. २२ सप्टेंबर रोजी श्री. सतिश कागलीवाल यांच्या अध्यक्षतेखाली अत्यन्त खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. सभेस श्री. सतीश कागलीवाल, श्री. अजित मुळे, श्री. समीर मुळे, श्री. रितेश मिश्रा, श्री. समीर अग्रवाल, श्री. मुकुंद करवा, श्री. प्रभाकर शिंदे, श्री. दिलीपराव देशमुख, श्री. सचिन भालींगे, श्री. नाथा राऊत, श्री. किशोर वीर, श्री. रामचंद्र नाके, श्री. अनिल हिरेमठ व श्री. प्रकाश तत्तर यांच्यासहित 42 कंपन्याचे 66 कंपनी प्रतिनिधी हजर होते. सिड इंडस्ट्रीज असोसिएशन ऑफ महाराष्ट्र (सियाम) ची वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये सन २०२२-२४ या कालावधीसाठी कार्यकारी मंडळासाठी निवडणूक पार पडली.
पंढरपूरच्या पठ्याची कमाल 2 एकरात पपईच्या लागववडीतून मिळवले 22 लाख रुपये
अजित सिड्स प्रा. लि. व्यवस्थापकीय संचालक श्री. समीर मुळे यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. तर उपाध्यक्षपदी श्री. रितेश मिश्रा व श्री. दिलीपराव देशमुख, सचिवपदी श्री. मुकुंद करवा व कोषाध्यक्षपदी श्री. सचिन भालींगे यांची निवड झाली. निवडणुक कामासाठी स्वतंत्र अशा ॲड. महेंद्र चव्हाण व डॉ. संजय पठारे यांचा समावेश असलेल्या निवडणूक समितीची नियुक्ती करण्यात आली होती. ॲड. महेंद्र चव्हाण यांनी प्रत्येक जागेसाठी एकच अर्ज प्राप्त झाल्याने निवडणूक बिनविरोध झाल्याचे सांगुन निकाल जाहीर केला.
PNB किसान योजना: शेतीशी संबंधित प्रत्येक गरज पूर्ण करण्यासाठी, शेतकऱ्यांना मिळणार 50,000 रुपये विना तारण कर्ज
सियाम कार्यकारी संचालक डॉ. शा. द. वानखेडे यांनी सर्व सभासदाचे स्वागत केले. सचिव श्री. मुकुंद करवा यांनी वार्षिक अहवालाचे वाचन केले. तसेच खजिनदार श्री. सचिन भालींगे यांनी २०२१-२२ चा वार्षिक ताळेबंद तसेच लेखापरीक्षण अहवाल व २०२२-२३ चा वार्षिक अर्थसंकल्प सादर केला. त्यास सर्वसाधारण सभेने एकमताने मान्यता दिली.
ONGC मध्ये थेट रिक्त जागा, परीक्षेशिवाय मिळणार सरकारी नोकरी, 1.8 लाखांपर्यंत पगार, 7व्या वेतन आयोगाअंतर्गत पगार
सतिश कागलीवाल यांनी अध्यक्षीय समारोपात त्यांच्या दोन वर्षाच्या कालावधीत कार्यकारिणीने केलेल्या सहकार्यबद्दल आभार मानले व मागील वर्षात सियामने केलेल्या विशेष कामाबाबत उहापोह केला, मुख्यतः सियामच्या पहिल्या बियाणे परिषदेचा, राष्ट्रीय स्तरावरील दोन्ही असोसिएशनच्या सियाम सोबतच्या सहकार्याचा व बियाणे उद्योगाची प्रतिष्ठा वाढविण्याच्या गरजेचा उल्लेख केला. पूर्वाध्यक्ष श्री. अजित मुळे यांनी सभेस मार्गदर्शन केले. यानिमित्त ग्रो इंडिगो कंपनीचे डॉ. राजेंद्र मराठे यांनी “सूक्ष्मजंतूंच्या खऱ्या क्षमतेचा बियाणेसाठी उपयोग” या विषयावर व खेतीबाडी कंपनीचे श्री. रविराज जमदाडे यांनी “बियाणे कंपन्यासाठी संगणकीय प्रणालीचा वापर” या विषयावर सादरीकरण केले.
शेतकरी सूक्ष्म सिंचन पद्धतीचा अवलंब करून पाणी व्यवस्थापनाबरोबरच पिकांचे चांगले उत्पादन घेऊ शकतात
नूतन कार्यकारिणी खालीलप्रमाणे श्री. समीर मुळे-अध्यक्ष, श्री. रितेश मिश्रा-उपाध्यक्ष (महिको सिडस प्रा.ली.), श्री. दिलीप रामराव देशमुख- उपाध्यक्ष (निर्मल सिडस प्रा. लि.), श्री. मुकुंद करवा-सचिव (कृषिधन व्हेजिटेबल प्रा. लि.), श्री. अक्षय भरतीया- सहसचिवबसंत अँग्रीटेक (ई.) लि.), श्री. किशोर वीर- सहसचिव (एलोरा नार्च्युल सीड्स प्रा. लि.), श्री. सचिन भालींगे- कोषाध्यक्ष (नामदेव उमाजी ऍग्रोटेक प्रा. लि.), श्री.नाथा राऊत- सह कोषाध्यक्ष (नोहोगोल्ड सीड्स प्रा. लि.), श्री. अजित मुळे-सदस्य (ग्रीन गोल्ड सिडस प्रा. लि.), श्री. वैभव काशिकार – सदस्य (अंकुर सिड्स प्रा. लि.), श्री. प्रभाकर शिंदे- सदस्य (पंचगंगा सिडस प्रा. लि.), श्री. सतिश कागलीवाल- इंमिडीयेट पास्ट प्रेसिडेंट नाथ (बायो- जिन्स (ई.) लि.), श्री. समीर अग्रवाल, श्री. राघवेंद्र जोशी व श्री. अक्षत झुनझुनवाला यांना “निमंत्रीत सदस्य म्हणुन मान्यता देण्यात आली. श्री. दिलीप देशमुख, नूतन उपाध्यक्ष यांनी उपस्थितांचे आभार मानले.
“बियाणे उद्योगासमोरील आव्हाने व संधी” यांचा उहापोह केला. तसेच त्यांनी शासनस्तरावर बियाणे कंपन्यांचे प्रलंबित असलेले प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचे सांगितले. बियाणे उद्योगाने नवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्याचीआवश्यकता विदीत केली. औरंगाबाद व जालना परिसर हा बियाणे उद्योगाची जन्मभुमी असुन, उद्योगास गतवैभव प्राप्त करण्यासाठी सर्व बियाणे कंपन्यांनी एकजुट दाखवावी, असे आवाहन केले. समीर मुळे अध्यक्ष सियाम यांनी केलं.
‘कंगना’ निवडणूक लढवेल म्हंटल्यावर ‘हेमा मालिनी’ म्हणे उद्या ‘राखी सावंत’ येईल