योजना शेतकऱ्यांसाठी

शेतकऱ्यांसाठी सरकारने आणली आहे ही खास फळबाग योजना..

Shares

शेतकऱ्यांचा कल पारंपरिक पिकापेक्षा फळबाग लागवडीकडे जास्त प्रमाणात वाढत आहे. शेतकऱ्यांना मदत व्हावी यासाठी सरकार देखील विविध योजनांच्या माध्यमातून हातभार लावत आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत फळबाग लागवड कार्यक्रम राबवण्यात येत आहे. आपण आज या फळबाग कार्यक्रमाची माहिती जाणून घेणार आहोत.

या योजनेचे उद्धिष्ट काय आहे ?
१. शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ व्हावी.
२. फळबाग लागवडीत वाढ होऊन पूरक व्यवसायात वाढ व्हावी.
३. फळबाग लागवडीखालील क्षेत्रात वाढ व्हावी.

या योजनेत कोणती फळपिके समाविष्ट आहेत ?
१. सीताफळ २. आवळा ३. संत्रा ४. पेरू ५. मोसंबी ६. जांभूळ
७. नारळ ८. बोर ९. कोकम १०. डाळिंब ११. आंबा १२. चिंच

या योजनेत समाविष्ट होणारी इतर वृक्षे , फुलपिके कोणते आहेत?
१. सोनचाफा २. साग ३. सुपारी ४. बांबू ५. शेवगा ६. कडुलिंब
७. मोगरा ८. निशिगंधा ९. गुलाब आदी

या योजनेसाठी काय पात्रता काय आहे ?
१. लाभार्थाच्या नावावर शेतजमीन असणे गरजेचे आहे.
२. जमीन जर कुळ कायद्याखाली असेल , सातबारावर कुळाचे नाव असेल तर कोणायच्या तरी संगतीने राबवण्यात येणे महत्वाचे आहे.
३. मनरेगा जॉब कार्ड असणे आवश्यक आहे.
४. लागवड केलेली झाडे दुसऱ्या , तिसऱ्या वर्षी पर्यंत बागायती ९० % , कोरडवाहू पिके ७५ % जिवंत राहिल्यासच दुसऱ्या , तिसऱ्या वर्षाचे अनुदान देय राहते.
५. या योजनेचा जॉब कार्ड धारक अ या प्रवर्गातील म्हणजेच अनुसूचित जाती – जमाती , दारिद्र रेषेखालील लाभार्थी, भूसुधार योजनेचे लाभार्थी, इंदिरा आवास योजनेचे लाभार्थी महिलाप्रधान कुटुंबे लाभ घेऊ शकतात.

जर तुम्ही फळबाग लागवड करत आहात तर वरील पात्रता तपासून तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता.

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *