लवंगी मिरचीने उडवला ठसका !
नैसर्गिक आपत्तीचा फटका जवळजवळ सर्व पिकांना बसला आहे.परंतु मिरचीने पिकाच्या बाबतीत मात्र उलटे झाले आहे. मिरचीच्या उत्पादनात वाढ झाली आहे. मिरचीच्या उत्पादनासोबत मिरचीच्या दरात देखील वाढ झाली आहे. काही दिवसांपूर्वी तर मिरचीला नंदुरबार मध्ये विक्रमी भाव मिळाला होता.लाल मिरचीच्या चांगल्या उत्पादनाबरोबर मागणी देखील जास्त प्रमाणात होत आहे. मागणीच्या तुलनेत पुरवठा अधिक झाला तर दरात घसरण होते हे बाजारपेठेचे सूत्र आहे. परंतु लाल मिरचीच्या बाबतीत मात्र सर्व उलटे झाले आहे आता तर सातारा बाजारपेठेत मिरचीच्या दरात चक्क ८० रुपयांनी वाढ झाली आहे.
मिरचीच्या दराने शेतकऱ्यांना मिळाले समाधान ?
बदलते वातावरण , अतिवृष्टी, अवकाळी पाऊस यामुळे शेतकरी त्रासलेला होता.या बदलत्या वातावरणाचा परिणाम पिकांवर जास्त प्रमाणात पडला होता. मिरचीची काढणी केल्यानंतर मिरची वाळवावी कशी? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला होता. नंदुरबार मध्ये या महिन्यात लाल मिरचीची १ लाख टन पर्यंत आवक झाली असून लाल मिरचीचे दर ४ हजार क्विंटल पर्यंत मिळाले आहे. सर्वसामान्य जनतेला जास्त पैसे मोजावे लागत असले तरी खूप दिवसानंतर शेतकरी सुखावला आहे.
४ प्रकारच्या मिरचीने उठवला ठसका..
साधारणतः सर्वच बाजारपेठेमध्ये मिरचीची आवक सुरु झाली आहे. मिरची पिकास पोषक असे वातावरण मिळाल्यामुळे मिरचीच्या उत्पादनात वाढ होऊन चांगले पीक बाजारात विक्रीसाठी आले आहे. मिरचीची दिवसेंदिवस आवक वाढत चालली आहे. तरीही याचा थोडाही परिणाम मिरचीच्या दरावर झालेला नाही. सातारा बाजारपेठेत गटूर मिरचीस १६५ रुपये, लवंगी मिरचीस १८० ते २०० रुपये, बेडगी मिरचीस ३२० रुपये, शंकेश्वरी मिरचीस २०० रुपये प्रमाणे दर मिळत आहे.