लाल मिरचीचा ठसका कायम, भावात तेजी
कोरोना काळात मिरचीच्या खरेदीमध्ये घट झाली होती. त्यामुळे शेतकऱ्यांना यंदा मिरची उत्पादनाकडून अनेक अपेक्षा होत्या. मात्र अतिवृष्टी तसेच अवकाळी मुळे मिरची पिकास चांगलाच मोठा फटका बसला. तसेच मिरचीला दूरवरच्या व्यापाऱ्यांकडे नेणे शेतकऱ्यांना शक्य झाले नाही. परिणामी व्यापाऱ्यांनी पुढाकार घेतल्याने मिरचीला चांगला भाव मिळाला नाही.
मिरचीचा भाव …
पहिल्या टप्प्यात तोडणी झालेल्या मिरचीला प्रति क्विंटल १८ हजार ते २१ हजार रुपये असा भाव सुरू आहे. एक क्विंटल मिरची पिकविण्यासाठी बराच खर्च येतो. मात्र मिरची उत्पादकाला क्विंटलमागे २४ ते २५ हजार रुपये भावाची अपेक्षा होती.
काही व्यापारी १६ हजार ५०० ते १८ हजार रुपये क्विंटलनुसार मिरचीची खरेदी करत आहे.
सध्या चांगल्या दर्जाची मिरची २३० ते २४० रुपये किलो दराने विकली जात आहे. हलक्या दर्जाची मिरची १५० ते १६० रुपये किलो दराने विकली जात आहे. खुडव्याचे दर ६० ते १०० रुपये आहेत. तर मागील वर्षापेक्षा मिरचीला यंदा चांगला दर मिळत आहे.
हे ही वाचा (Read This) सूक्ष्म अन्न उद्योग योजना, १० लाख पर्यंतच्या उद्योगासाठी ३५ % सबसिडी असा करा अर्ज
मिरचीच्या लागवडीसाठी झालेल्या खर्चाच्या तुलनेत नफा कमी …
अवकाळीमुळे मिरचीचे पिकाचे मोठे नुकसान झाले तर मिरची लागवडीसाठी जास्त खर्च लागला. मात्र त्या मानाने भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागत आहे.
मिरची तोडणीचा पहिला टप्पा आता संपला असून मिरची जिल्ह्यातील काही बाजारपेठेत नेऊन शेतकरी विकण्याचा प्रयत्न करीत आहेत. आता दुसऱ्या टप्प्याचीही तोडणी सुरू झाली आहे. पहिल्या व दुसऱ्या टप्प्यात मिरची मोठ्याप्रमाणात हातात येते तर यावर शेतकऱ्यांची अर्थव्यवस्था अवलंबून असते. कारण तिसऱ्या टप्यामध्ये मिरचीचे उत्पादन मुबलक प्रमाणात मिळत नाही.