पशुधन

शेतीला अनुसरून व्यवसायाला उत्तम पर्याय म्हणजे बटेर पालन – संपूर्ण माहिती

Shares

डॉ.शरद कठाळे विषय विशेषज्ञ (पशु विज्ञान)कृषी विज्ञान केंद्र अमरावती १


नमस्कार शेतकरी बांधवांनो आजचा विषय आहे जोड व्यवसाय! मनात जिद्द असेल तर कोणताही व्यवसाय करता येतो.जसे की बटेर पालन हा एक उत्तम पर्याय आहे आता थोडे समजून घेऊ बटेर पक्षी सर्व प्रकारच्या हवामानात वाढु शकतो. या व्यवसायात भाग भांडवल कमी लागते. या व्यवसायातुन लवकर मिळकत सुरु होते. पक्षी लवकर वयात येतो. दोन पिढ्यामधील अंतर कमी असते. बटेर पालनासाठी जागेची आवश्यकता कमी असते. खाद्य कमी लागते. वाढ जलद होते. पांच आठवड्यात मांसल पक्षी तयार होते. रोगांची काळजी कमी घ्यावी लागते. लहान मुलांना व गर्भवती महिलांना मांस पोषक ठरते. 

हे ही वाचा (Read This) शेतीसाठी गाळमाती वापरतांना काय घ्यावी काळजी?

उत्कृष्ठ प्रतिची प्रथिने व अत्यल्प कोलेस्ट्रॉल प्रमाण असल्यामुळे लाव्ही पक्ष्यांचे मांस हे हृदयरोगी व टि.बी. ग्रस्त रुग्णांसाठी वरदान ठरते.बटेर पक्षी ६ आठवड्यापासुन अंडी उत्पादन सुरु होते. बटेर पक्ष्यांचे अंड्याचे वजन १०-१४ ग्रॅम असते. एका अंड्यात १३ अमायनो अॅसिड, १३ फॅटी अॅसिड व १० मिनरल्स असतात. बटेर पक्ष्यांचे अंड्यामध्ये कोलेस्ट्रॉलचे प्रमाण १८.८ मिली/ग्रॅम असते. असील पक्षामध्ये हेच प्रमाण २२.०६, कडकनाथ २२ आणि गिनी फाऊल १५.७७मी.ग्रॅम योक मध्ये असते. *पाळलेले पक्षी* पंखावर सफेद लाल काळे रंग असतात. पाच आठवड्यात वजन २००-३०० ग्रॅम होते. हे पक्षी पुर्ण वर्षात २५०-३०५ अंडी देतात. ह्या पक्षांची प्रजनन क्षमता जास्त असते.

ह्या पक्षांचे मुळ स्थान जपान आहे. ह्यालाच कॉरटुनिक्स जपोनिका असे वैज्ञानिक भाषेत म्हणतात. हॅचरी व्यवसायातुन लहान पिल्ले तयार होतात. जंगल पक्षी जंगली बटेर मध्ये फक्त काळा रंग असतो. संपुर्ण जिवनकाळतले वजन ४०-१० ग्रॅम होते. एका वर्षात ४०-५० अंडी देतात. ह्या पक्ष्यांची प्रजनन क्षमता कमी असते. ह्या पक्षांचे मुळ स्थान भारत किंवा एशिया आहे. बटेर पक्षी कोंबड्यापासुन वेगळ्या असतात. बटेर पक्षी कोंबड्याच्या तुलनेत कमी वजनाचे असतात. हे पक्षी उडू शकतात. हे पक्षी वयाच्या ७व्या आवठवड्यातच वयात येतात. ह्या पक्षांना तुरा आणि गलोल नसतात. बटेर पक्ष्यांचे व्यवस्थापन*बटेर पक्ष्यांच्या वाढीमध्ये बुडींग मध्ये घेतलेल्या काळजीला विशेष महत्व आहे.

कमी कष्टात जास्त उत्पन्न मिळवायचे असेल तर नेहमी मागणी असलेल्या काळ्या मिरीची लागवड करा.

हे पक्षी लहान असल्यामुळे वातावरण, तणाव इत्यादी गोष्टींमुळे त्यात लवकर फरक पडतो. व्यवस्थापन हा या व्यवसायात सर्वात महत्वाचा घटक आहे.पक्षी फॉर्मवर येण्याआधीचे नियोजन*  कोणत्याही व्यवसायामध्ये गोष्ट झाल्यावर विचार करण्यापेक्षा ती होऊ नये.म्हणून काळजी घेणे आवश्यक आहे. ह्यासाठी पक्षी येण्यापूर्वी सर्व जागा ही झाडून घ्यावी. फ्लेम गनच्या साहाय्याने सर्व भिती कोपरे जाळून घ्यावे. त्यानंतर कोणत्याही डिर्टजन्ट ने धुवून घ्यावी. सर्व प्रथम पाण्याच्या प्रेशरने सर्व घर धुवावे. त्यामुळे घरात राहिलेली धुळ, लिटर, खाद्य, विष्ठा हे निघून जाईल. घराचे फ्युमीगेशन करण्यासाठी २० ग्रॅम पोटॅशियम, परमॅग्रेट व ४० मिली फॉरमॅलीन हे १०० चौ. फुट जागेसाठी वापरावी. हे करत असतांना सर्व खिडक्या व दारे बंद करावी. कमीत कमी २४ तास दारे खिडक्या उघडू नयेत.अशाप्रकारे स्वच्छ केलेले घर पिल्लासाठी वापरावे. पिल्ले येण्याआधी लिटर भुसा बुडींग जागेमध्ये पसरावा. त्यांच्या बाजुन चिकगार्ड लावावे व पेपर पसरावे.

चिकगार्डमध्ये ब्रुडर लावावे. पक्षी येण्याअगोदर बुडर चालु करावे. त्यामुळे पक्षी घरातील तापमान पिल्लांना योग्य असे होईल पाण्याची भांडी ब्रुडरगार्ड मध्ये पक्षी येण्याअगोर ४ तास भरून ठेवावीत. पिल्लांची निवड उत्कृष्ट प्रतीवी १ दिवसाची पिल्ले उत्पादन करणे हा व्यवसायातील महत्वाचा टप्पा आहे. बुटेर पक्ष्यांची पिल्ले लहान असुन त्यांचे सरासरी वजन ४ ते १० ग्रॅम असते. सर्वसाधारणपणे हा व्यवसाय करणाऱ्याने स्वतःजर पिल्लांचे उत्पादन केले तर व्यवसायातील फायद्यात वाढ होईल. तसे पिल्लांची नियमिती व आवश्यक असेल तेव्हा पुरवठा योग्य होईल. *बटेर पक्षांची घरे पक्ष्यांची घरे बांधताना त्यांची वाढ व्यवस्थीत होईल व व्यवस्थापन सोपे होईल याचा विचार करून बांधावी घराची बांधणी करतांना जागेची निवड महत्वाची असते. त्यासाठी बाबींची पुर्तता करावी. दळणवळणाची योग्य सोय असावी जसे फॉर्म रस्ते, रेल्वे बाजारापासुन जवळ असावा घराची जमीन राहत्या वस्तीपासून दुर असावे.

पीएम किसान: तुमच्या स्टेटसवर लिहिले आहे का FTO is Generated, असेल तरच पुढचा हप्ता मिळणार

घराच्या जागेभोवती झाडे झुडपे असावी.भविष्यात फार्मचा विस्तार करता येईल अशी जागा शोधावी. घरच्या पध्दती बटेर पक्षी गादी पध्दत किंवा पिंजरा पध्दतीत पाळता येतात.गादी पध्दतीची घरे : घरे ही पिल्लांच्या संख्येनुसार बांधावी. घराची रुदी २५-३० फुट, घराच्या छपरांची उंची जमीनीनपासून १० ते १२ फुट असाव्यात.पिंजरा पध्दती दोन वगेवगळ्या प्रकारचे पिंजरे हे बटेर पक्ष्यांना वाढविण्यासाठी वापरतात. बुडिंग पिंजरा हे १७-१८ दिवसापर्यंत पिल्लांसाठी वापरतात. ग्रोअंग पिंजरे १८ दिवसापासुन पक्षी बाजारात विकण्याच्या रुपात वापरतात. ब्रुडर पिंजऱ्याचे आकारमान १५० सें.मी. लांब, १२० से.मी. रुंद व २५ से.मी. उंच अशा पध्दतीत ठेवून किंवा ५ टायर ह्या पध्दतीत पिंजरे बांधतात. त्यानंतर प्रत्येक टायर ६० बाय ६० से.मी. रुंदी ४ कंपार्टमेंटमध्ये विभागला जातो. प्रत्येक कंपाटमेंटमध्ये ४ १०० पिल्ले याप्रमाणे एका टायमध्ये ४०० पिल्ले ठेवता येतात. ग्रोअर पिंजऱ्याचे आकारमान २४० सें.मी. लांब, १२० से.मी. रुंद व २५ सें.मी. उंच अशा पध्दतीत ठेवून ४ किंवा ५ टायर ह्या पध्दतीत पिंजरे बांधतात. त्यानंतर प्रत्येक टायर १२० x ६० सें.मी. अशाप्रकारे ४ कंपार्टमेंटमध्ये विभागतात. प्रत्येक टायर कंपार्टमेंटमध्ये ६० ग्रोअर पक्षी ठेवता येतात. अशाप्रकारे एका टायरमध्ये २४० वाढणारे पक्षी ठेवतात.

अंडी देणाऱ्या पक्ष्यांची घरे अंडी देणारे पक्षी आपण पिंजरा पध्दतीत किंवा गादी पध्दतीत पाळु शकतो. पिंजरा पध्दतीत प्रति पक्ष्याला १५० चौ. सें.मी. इतकी जागा द्यावी ह्यामध्ये पाण्याची भांडी पिंजऱ्या बाहेर ठेवावी किंवा निपल पध्दतीत पिंजऱ्यात पाण्याची सोय करावी. खालील भागाला उतार असावा जेणेकरून अंडे घरंगळत पुढील जाळीत येईल.पक्ष्यांघरातील उपकरणे   व पाण्याची भांडी ही स्वच्छतेस सुलभ व स्वस्त असावीत चिक वॉटर फाऊनेटन तळाशी ६ सें.मी. व्यास १ ते २ से.मी. खोल थाळीवर प्लॉस्टीकचा मग उपडा करून ठेवावा. खाद्याची भांडी :- भांडी टिकाऊ व आर्थिकदृष्ट्या परवडणारी असावी. २४ गेजचा पत्रा वापरुनही भांडी तयार करता येतात हि भांडी ३० सें.मी. लांब व ५ सें.मी. रुंद व २ सें.मी. खोल असतात. खाद्याची नासाडी होऊ नये म्हणून तोंडाची बाजु १ सें.मी. आत वाळलेली असते.पिल्लांचे संगोपन पहिल्या आठवड्यात तुसापासुन ४ से.मी. उंचीवर ९५ सें. मी. फॅरेनाईट इतके गरजेचे असते. प्रत्येक आठवड्यात ५ डिग्री फॅरेनाईट ने तापमान कमी करावे व ते ७५ डिग्री फॅरेनाईट वर आणावे वेळोवेळी तापमान थर्मामीटरने तपासून घ्यावे. ह्यासाठी बास्केट ब्रुडर, हॉवर, ब्रुडर इनफॉरेड, ब्रुडर वापरावे. वायुविजन पक्ष्याच्या घरातील हवा खेळती असावी ह्याकरीता घरात योग्यवायुविजन असण्याची कारणे खालील प्रमाणे आहेत.

मातीजन्य रोग व्यवस्थापनासाठी ट्रायकोडर्माचा अवलंब कसा कराल – संपूर्ण माहिती

पक्षांना सतत शुध्द हवा व ऑक्सीजन मिळावा. पक्षी घरातील दुषित हवा तसेच अमोनिया कार्बनडॉय ऑक्साईड, कार्बफ़ मोनॉक्साईड हे घातक वायु पक्षी घरातुन निघुन जावे. पक्षी घरात योग्य तापमान व आर्द्रता राखता यावी. पक्षी घरातील लिटर सुस्थितीत राहावे. आर्द्रता अतिजास्त व एकदम कमी आदद्रता पिल्लांना घातक असते. गादी पध्दतीत पक्ष्यांच्या वाढीसाठी ५० ते ७५ टक्के हवेतील आर्द्रता चांगली असते. *पाणी*रोज पक्ष्यांना स्वच्छ व ताजे पाणी प्यावे. पाण्याची भांडी रोज स्वच्छ धुवावीत. प्रकाश पहिले दोन आठवडे पिल्लांना ४२ तास प्रकाशात ठेवले जाते. नंतर प्रकाश .कमी करून ३ आठवड्याच्या शेवटी फक्त १२ तास प्रकाशात ठेवले जाते. बटेर पक्ष्यांची अंडे हे पक्षी वयाच्या ६ व्या आठवड्यापासुन अंडी देतात. ह्या पक्षांचे अंडी देण्याचे प्रमाण १३-१५ आठवड्यात असते. त्यांच्या अंड्याचे वजन शरीराच्या वजनाच्या ५% असते. जास्तीत जास्त अंडी ३ ते ६ ह्या वेळेत देतात. अंड्याचे सरासरी वजन ४ १० ग्रॅम असते. दिवसातुन साधारणपणे ३ वेळा अंडी गोळा करावीत. ह्या अंड्याचे कवच पातळ असल्यामुळे अंडी गोळा करतांना विशेष काळजी घ्यावी. बटेर पक्षांचे अंडे हे अधिक चवदार असते. ह्यामध्ये अधिक पिवळा बलक असतो. तसेच प्रथिनांचे प्रमाण देखिल कोंबड्याच्या अंड्यापेक्षा अधिक असतात….

धन्यवाद मित्रांनो

विचार बदला जिवन बदलेल

ही माहीती सरांच्या मार्गदर्शनातून

डॉ.शरद कठाळेविषय विशेषज्ञ पशु विज्ञानकृषी विज्ञान केंद्र घातखेडअमरावती १

माहीती संकलण

मिलिंद जि गोदे

Save the soil all together

हेही वाचा :- राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांची माफी मागावी अन्यथा अयोध्येत येऊ देणार नाही – भाजप खासदारासह हिंदू संत-महंतांचा निर्णय

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *