इतक्या तासांच्या आत पीक नुकसान झाल्याची सूचना देणे अनिवार्य !
खरीप हंगामात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असतांना रब्बी पिकांकडून शेतकऱ्यांना अपेक्षा होती. मात्र अवकाळी (Untimely Rain) मुळे रब्बी पिकांचे देखील जास्त प्रमाणात नुकसान झाले आहे. राज्यातील सर्व शेतकरी (Farmers) सरकारकडे नुकसान भरपाईची मागणी करत आहेत. परंतु शेतकऱ्यांना नुकसान भरपाई हवी असेल तर पिकाच्या नुकसानीची पूर्वसूचना विमा कंपनीकडे सादर करणे आवश्यक आहे. पिकांचे नुकसान झाल्यापासून ७२ तासांच्या आत त्यांना नुकसान भरपाई पूर्वसूचना द्यावी लागणार आहे. शेतकरी ही पूर्वसूचना ६ पद्धतीने सादर करू शकतो.
पूर्वसूचना सादर करण्याचे पर्याय
१. विमा कंपनीच्या 1800 2660 700 या टोल फ्री क्रमांकावर पूर्वसूचना देता येणार आहे.
२. विमा कंपनीचे तालुकास्तरीय कार्यालय (insurance company office).
३. कृषी विभागाचे मंडल कृषी अधिकारी कार्यालय (circle officer)
४. ज्या बँकेत विमा जमा केला ती बँक शाखा (bank branch)
५. क्रॉप इन्शुरन्स ॲप (Crop insurance app)
६. विमा कंपनीच्या https://pmfby.gov.in/ च्या ई-मेल वर
हे ही वाचा (Read This Also ) युवा शेतकऱ्यांना मिळणार शासनाकडून या व्यवसायासाठी 50% अनुदान .
अवकाळीचा फटका वर्षाच्या शेवटीही
रब्बी पिकांच्या पेरणीला महिनाभर उशीर झाला आहे. अगदी पेरणीपासूनच रब्बी पिकांवर दृष्टचक्र फिरत होते. पेरणी केल्यानंतर अवकाळी पडलेल्या पावसामुळे दुबारा पेरणी करावी लागली होती. आता पिकास अनुकूल असे वातावरण असतांना अवकाळी पावसाने ज्वारी, हरभरा, राजमा, सूर्यफूल, गहू या पिकांचे नुकसान केले असून ३० डिसेंबर पर्यंत ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेमध्ये सहभाग घेतला होता अश्या शेतकऱ्यांना पूर्वसूचना दाखल करण्यात येणार आहे. मागील ३ दिवसांपासून अवकाळीने विधार्भासह मराठवाड्यात हजेरी लावली होती. वर्षाच्या शेवटी देखील अवकाळीचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे.
अवकाळीमुळे पिकांचे नुकसान झाले असेल तर नुकसान झाल्यानंतर ७२ तासांच्या आत नुकसान भरपाई पूर्वसूचना देणे गरजेचे आहे.