डाळिंब उत्पादन निम्म्याने,दरात ही घट
डाळिंबाचे आधीच अतिवृष्टी, अवकाळी मुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. डाळिंबाचे अगदीच कमी उत्पादन झाले असून अवकाळी मुळे डाळिंबावर रोगाचा प्रादुर्भाव झाला होता. त्यामुळे डाळिंबाचे उत्पादन कमी झाले आहे. बाजारपेठेच्या दराचे एक सूत्र आहे त्या सूत्रानुसार शेतकरी , व्यापारी निर्णय घेत असतात. मात्र डाळिंबाच्या बाबतीत हे सूत्र चुकलेले आहे असे दिसून यात आहे. हे सूत्र असे आहे की , उत्पादनात घट झाली तर दरात वाढ होते. खरीप मध्ये पिकांचे मोठे नुकसान झाले होते. हे नुकसान आता डाळिंब भरून काढेल अशी शेतकऱ्यांची अपेक्षा होती. मात्र, सगळे उलटेच घडत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दुहेरी संकटांना सामोरे जावे लागत आहे.
निर्यातीवर झाला परिणाम
डाळिंबाची महाराष्ट्रातून भारतभर निर्यात होत असते. तर आपल्या देशातून युरोपला अंदाजे २ हजार टन पर्यंत निर्यात केली जाते. मात्र या वेळेस डाळिंब पिकास मोठा नैसर्गिक फटका बसला आहे. युरोपमध्ये या वेळेस ३०० टन डाळिंबाची निर्यात करण्यात आली होती. त्यामुळे डाळिंब उत्पादकाला दुहेरी नाही तर तिहेरी संकटाचा सामना करावा लागत आहे असे म्हणण्यास काही हरकत नाही.
आता बीजोत्पादनासाठी मिळणार १०० % अनुदान. हे ही वाचा.
डाळिंबाचा दर
हंगामाच्या सुरुवातीला डाळिंबास १३० ते १५० रुपये प्रति किलो प्रमाणे दर होता. काही दिवसांपूर्वी दरात १५ ते २० रुपायांनीं वाढ झाली होती. मात्र त्यानंतर अवकाळी मुळे डाळिंब बागायतमध्ये रोगाचा प्रादुर्भाव झाला होता. त्यात आता परराज्यातून होणारी डाळिंबाची आवक वाढली आहे. याचा परिणाम दरावर होतांना दिसून येत आहे. आता डाळिंबाचे दर १०० ते ८० रुपये प्रति किलो वर येऊन थांबले आहे.