मोदींचे अल्पभूधारक शेतकऱ्यांना आवाहन !
शेतकरी अधिक उत्पादन व्हावे यासाठी रासायनिक खतांबरोबर विविध प्रयोग करत असतो. त्यामुळे जमिनीचे आरोग्य धोक्यात आले आहे आणि जमिनीचे आरोग्य धोक्यात म्हणजेच नागरिकांचे आरोग्य धोक्यात आहे असे म्हणता येईल. उत्पादन वाढीच्या प्रयत्नांमध्ये जमिनीकडे दुर्लक्ष होत चालले आहे. जर तुम्हाला वाटत असेल रासायनिक खतांचा वापर न केल्यास उत्पादनात वाढ होत नाही तर हा तुमचा गैरसमज आहे. रासायनिक खतांचा सतत असाच वापर होत गेला तर अगदी काही कालावधीतच शेती व्यवसायाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होईल. हीच योग्य वेळ आहे नैसर्गिक शेतीकडे वळण्याची असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील शेतकऱ्यांना केले आहे.
कमी खर्चात कसे घेता येईल अधिक उत्पन्न ?
नैसर्गिक शेतीस अत्याधुनिक तंत्राची जोड दिल्यास उत्पादनात जास्त प्रमाणात वाढ होईल. अनेक शेतकऱ्यांना भीती आहे की नैसर्गिकरीत्या शती केल्यास उत्पादनात घट होईल. परंतु असे न होता त्याचा फायदाच होणार आहे. त्याचबरोबर रासायनिक खते, कीटकनाशके यांचा खर्च देखील वाचेल. शेती मध्ये हा बदल घडवून आणणे ही आता काळाची गरज झाली आहे. गुजरात , हिमाचल प्रदेश येथे शेतकऱ्यांनी हा बदल स्वीकारला आहे. हा बदल देशातील सर्व शेतकऱ्यांनी लवकरात लवकर स्वीकारावा. जेणेकरून त्यांचा अधिक फायदा होईल.
रासायनिक खतांमुळे कसे होते दुहेरी नुकसान ?
शेतकरी केवळ उत्पादन वाढीसाठी रासायनिक खतांचा अवलंब करत आहे. मात्र यामुळे जमिनीचे अधिक नुकसान होत आहे. कीटकनाशके, रासायनिक खते यांमुळे जमिनीचे आरोग्य धोक्यात आले आहे असेच चालत राहिले तर भविष्यात शेती करणे फार अवघड जाईल. शेतकऱ्यांनी टप्याटप्याने का होईना नैसर्गिक पद्धतीचा वापर करावा ,असे आवाहन पंतप्रधान नरेंद मोदी यांनी केले आहे.