इतर बातम्यापिकपाणी

एका एकरात करा या झाडाची लागवड, नक्कीच बनवेल करोडपती

Shares

आपण आज अश्या झाडाची माहिती जाणून घेणार आहोत ज्याची लागवड करून तुम्ही १२ वर्षात तुमचे करोडपती बनण्याचे स्वप्न पूर्ण करू शकता. हे झाड म्हणजे महोगनीचे झाड होय.

तुम्ही एक एकर जागेत १२० झाडांची लागवड केली तर तुम्ही १२ वर्षात करोडो रुपये कमवू शकता. महोगनी हे सदाहरित वृक्ष असून ते २०० फूट उंच वाढू शकते. म्हणजेच एका झाडापासून साधारणतः १५०० घनफूट लाकूड मिळते. ज्याची किंमत ८० ते ९० हजार पर्यंत होईल.

हे ही वाचा (Read This ) या तेलबियाची लागवड करा अन् भरघोस उत्पादन मिळवा

महोगनीचे झाड हे १२ वर्षांनी लाकूड काढण्यासाठी तयार होते तर यांच्या बियाण्यांची किंमत १ हजार रुपये प्रति किलो अश्या किमतीत विकली जाते. या झाडाचे लाकूड रंगाने लाल तसेच तपकिरी असून पाण्यामुळे हे खराब होत नाही.

महोगनी झाडाचे फायदे

महोगनीचे झाड हे मौल्यवान मानले जात असून हे पूर्णपणे तयार होण्यासाठी १२ वर्षे लागतात. हे झाड अत्यंत मजबूत आणि टिकाऊ असते. या झाडावर पाण्याचादेखील परिणाम होत नसून याचा वापर जहाजे, दागिने, सजावट, शिल्पे, प्लायवुड बनवण्यासाठी केला जातो.

महोगनीच्या झाडांच्या पानांमध्ये दमा, सर्दी, कर्करोग,रक्तदाब, मधुमेह आदी आजारांवर नियंत्रण आणण्याचे गुणधर्म दडलेले आहेत.
या झाडाच्या पानांमध्ये असा काही प्रकार आढळतो की, त्यामुळे कीटक, डास त्या झाडाजवळ येत नाहीत. त्यामुळे याच्या पाने आणि बियाण्यांचे तेल हे डास प्रतिबंधक, कीटकनाशक बनवण्यासाठी वापरतात. तसेच तेल, साबण, रंग आणि औषधे बनवण्यासाठी याचा वापर करतात.

महोगनीची लागवड करून करोडो रुपये मिळवू शकतो

महोगनीची झाडे १२ वर्षात लाकूड कापणीसाठी तयार होतात आणि पाच वर्षातून एकदा बिया देतात, त्याच्या बियांची किंमत खूप जास्त आहे आणि ते एक हजार रुपये किलोपर्यंत विकले जाते, तर त्याचे लाकूड २००० ते २२०० रुपये प्रति घनफूट दराने विकले जाते.

याचा औषधे , सौंदर्य प्रसाधने बनवण्यासाठी वापर केला जात असल्यामुळे यास मागणी देखील जास्त असून यातून करोडो रुपये कमवता येऊ शकतात.

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *