पीक विम्याचे पैसे अडकले ऑनलाईन ऑफलाईन च्या घोळात !
अतिवृष्टीमुळे पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. पिकाच्या नुकसानीची तक्रार शेतकऱ्यांनी ७२ तासांच्या आत विमा कंपनीकडे ऑनलाईन पद्धतीने करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. परंतु अनेक शेतकरी तांत्रिक अडचणीमुळे ऑनलाईन तक्रार करू शकले नाही. तर काहींनी ऑनलाईन तक्रार केली परंतु त्याचे दावे करू शकले नाही. यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यावर विमा रकम जमा झाली नाही. त्यामुळे उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात ३०० ते ४०० शेतकऱ्यांनी हजेरी लावली होती. गेल्या ३-४ दिवसापासून पीक नुकसान भरपाई रकम खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली होती. मात्र अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात हि रकम जमा झालेली नाही.
शेतकऱ्यांनी काय केली तक्रार ?
अतिवृष्टीमुळे पिकांचे अतिशय जास्त प्रमाणात नुकसान झाले होते. नुकसान झाल्याची माहिती ही ऑनलाईन देण्यात यावी अशी सरकारने सूचना दिली होती. अनेक शेतकऱ्यांकडे ऑनलाईन सुविधा उपलब्ध नव्हती. तर अनेकांना याबाबत काही माहिती देखील नव्हती. त्यामळे अनेक शेतकरी ऑनलाईन तक्रार नाही करू शकले. त्यानंतर काही शेतकऱ्यांनी ऑफलाईन अर्ज केले होते. मात्र त्यांच्याही खात्यात एक विमा नुकसान भरपाई जमा झालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी पीक विमा नुकसान भरपाई खात्यात जमा न झाल्याची तक्रार जिल्हाधिकारी कार्यालयात केली.
ऑनलाईन तांत्रिक अडचण आली होती असे सांगून पीक विमा नुकसान भरपाई टाळता येणार नाही. शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करा अशी मागणी करत ३०० ते ४०० शेतकऱ्यांनी थेट उस्मानाबाद जिल्हाधिकारी गाठले आहे.