पपई वरील सर्वात धोकादायक रोग, रिंग स्पॉट वायरस.
पपई आता जास्त लोकप्रिय होत आहे. अनेक औषधांमध्ये पपई चा उपयोग केला जातो. यामध्ये अनेक गुणधर्म दडलेले आहेत. पपई पिकाची रोगापासून बचाव होण्यासाठी विशेष काळजी घ्यावी लागते. पपई पिकावरील सर्वात धोकादायक रोग म्हणजे रिंग स्पॉट वायरस. हा रोग पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान करतो. पपई पीक सर्वात जास्त उत्पादन देणारे पीक आहे. रिंग स्पॉट वायरस हा विषाणूजन्य रोग आहे. या रोगाबद्दल संपूर्ण माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.
रिंग स्पॉट वायरस चे लक्षणे –
१. या विषारी विषाणूचा संसर्ग झाल्यास १५ दिवसातच याचे लक्षणे दिसण्यास सुरुवात होते.
२. सुरवातीला पानांवर याचा परिणाम होतो. पाने पिवळी फिकट हिरव्या रंगाची होऊन पिवळी पडतात.
३. पानांच्या बाजूस हिरव्या शिरा मुरडतात.
४. रोगाचा प्रादुर्भाव जसजसा वाढतो तसतसा पानांचा आकार लहान होत जातो.
५. बुटांच्या लेस प्रमाणे पानांची टोके दिसू लागतात.
६. झाडांची वाढ होत नाही. ती बुटकी राहतात.
७. झाडांची पाने खडबडीत होतात.
८. पानांचा आकार लहान होऊन अन्नद्रवे तयार होण्याची क्रिया मंदावते कालांतराने ती थांबून जाते.
९. झाडाची पाने वेडीवाकडी वाढतात.
१०. पपईच्या फळांवर गर्द हिरव्या रंगाचे चट्टे दिसतात.
११. फळांची वाढ होत नाही तर फळांच्या संख्येत घट होते.
रिंग स्पॉट वायरस रोगावर उपाययोजना –
१. या रोगाची लक्षणे दिसताच रोगग्रस्त झाडे मुळांसोबत उपटून जाळून नष्ट करून टाकावेत. जेणेकरून विषाणूंचा प्रसार होणार नाही.
२. मावा कीड या विषाणूचे वाहक समजले जाते. त्यामुळे मावा किडीचे नियंत्रण करणे आवश्यक आहे. यासाठी शेतात एकरी २० पिवळे चिकट सापळे लावावेत.
३. पपई फळबागेत कुंपणावर मका , ज्वारीचे पीक लावावेत.
४. पालाशयुक्त खतांचा वापर करावा. जेणेकरून रोगप्रतिकारशक्ती वाढेल.
५. नत्र संतुलित प्रमाणात द्यावे जेणेकरून नत्राच्या अतिसारामुळे रोगाची तीव्रता वाढणार नाही.
६. पपई बागेत आंतरपिक म्हणून काकडी वर्गीय पिकांची लागवड करू नये.
पपई पिकाच्या उत्तम व जास्त उत्पादनासाठी या पिकांची काळजी घेणे गरजेचे आहे.