पानकोबीचे अधिक उत्पन्न घ्यायचे असेल तर, या जाती आहेत महत्वाच्या !
थंड हवामानात घेतले जाणारे कोबी पीक जगभरात लोकप्रिय आहे. या पिकाची लागवड ही सप्टेंबर ते ऑक्टोबर महिन्यात केली जाते. महाराष्ट्रात कोबीची लागवड अंदाजे सर्वच जिल्ह्यात केली जाते. कोबीमध्ये अ , क जीवनसत्वे मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतात. कोबी आरोग्यासाठी उत्तम मानली जाते. कोबी पिकास बाजारात मोठ्या संख्येने मागणी असते. आपण आज कोबीच्या अधिक उत्पन्न मिळवून देणाऱ्या वाणांची माहिती जाणून घेणार आहोत.
कोबीचे वाण –
प्राईड ऑफ इंडिया-
१. कोबीच्या या जातीच्या गड्ड्याचे वजन दीड ते दोन किलोपर्यंत असते.
२. या जातीच्या कोबीचा आकार मोठा असतो.
क्रांती –
१. कोबीची ही विकसित जात लागवडीनंतर ९३ दिवसात काढणीसाठी तयार होते.
२. या कोबीचे १ किलोपर्यंत वजन असते.
३. कोबीच्या या जातीचे प्रति हेक्टरी ५० ते ५५ टन पर्यंत उत्पादन मिळते.
कावेरी-
१. कोबीची ही जात इंडो अमेरिका हायब्रीड सीड्स या कंपनीने विकसित केली आहे.
२. कोबीच्या या जातीची लागवड केल्यानंतर ६५ दिवसांनी काढणीस तयार होते.
३. या जातीच्या कोबीचे वजन २ किलो पर्यंत असते.
४. या जातीच्या कोबीची लागवड उन्हाळ्यात देखील करता येते.
श्री गणेश गोल्ड –
१. कोबीच्या या जातीची पाने निळसर हिरव्या रंगाची असतात.
२. या जातीच्या कोबीची लागवड केल्यानंतर साधारणतः ९० ते ९५ दिवसात काढणीस तयार होते.
३. या जातीच्या कोबीच्या गड्ड्याचे वजन अडीच किलो पर्यंत असते.
४. कोबीच्या या जातीपासून प्रति हेक्टरी ७५ ते ८७ टन पर्यंत उत्पादन मिळते.
हरिराणी गोल –
१. या जातीच्या कोबीची लागवड केल्यानंतर ९५ दिवसांनी याची काढणी करता येते.
२. या कोबीच्या जातीची पाने निळसर हिरव्या रंगाची असतात.
३. यांच्या गड्डयांचे सरासरी वजन दीड किलो पर्यंत असते.
४. कोबीच्या या जातीची लागवड करून प्रति हेक्टरी ५६ ते ६० टन उत्पादन मिळवता येते.
गोल्डन एकर –
१. कोबीच्या या जातीचे गड्डे आकाराने लहान असतात.
२. यांचे वजन एक ते दिड किलो पर्यंत असते.
३. साधारणतः लागवडीनंतर ७० ते ८० दिवसात काढणीस तयार होतात.
कोबी पिकाची लागवड करतांना या वाणांची लागवड केल्यास उत्पन्नात वाढ होण्यास मदत होते.