इतर बातम्याबाजार भाव

कांद्याच्या दरात स्थिरता, जाणून घ्या आजचे दर

Shares

कांद्याच्या दरामध्ये मागील काही दिवसापासून सतत घट होत आहे. आधीच शेतकरी नैसर्गिक संकटांमुळे अडचणीत आला होता त्यात आता शेतमालाला योग्य दर मिळत नसल्यामुळे शेतकरी आता आर्थिक अडचणीत सापडला आहे.

कसे होते कांद्याचे दर ?

मध्यंतरी कांद्याला कमाल २६२५ रुपये, किमान ६५१ रुपये तर सर्वसाधारण २१०० रुपये प्रतिक्विंटल असा बाजार भाव मिळत होता. तर त्यानंतर कांद्यास कमाल २०७७ रुपये, किमान ९०० रुपये तर सर्वसाधारण १७५० रुपये प्रतिक्विंटल ला बाजार भाव मिळत होता .

मागील ८ दिवसांमध्ये लाल कांद्याच्या दरात ७६४ रुपयांची तर उन्हाळी लाल कांद्याच्या दरात ६३० रुपयांची घसरण झाली होती.

कांद्याचे आजचे दर

kanda bhav

आता तर या दरामध्ये अधिक घसरण झाल्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी चिंतीत झाला असून आता पुढे काय असा प्रश्न त्यांना पडला आहे. तर शेतकऱ्यांबरोबर व्यापारी देखील आता चिंतेत पडले आहे.

निर्यातीवर निर्बंध आणल्यामुळे करावा लागतोय अधिक अडचणींचा सामना

सध्या युद्धजन्य परिस्थितीमुळे कांदा निर्यातीवर निर्बंध लावण्यात आले आहे. वेळेवर कांद्याची निर्यात न झाल्यास कांदा खराब होतो. त्यामुळे स्वतःच्या रिस्क वर कांद्याची निर्यात करावी लागणार आहे.
त्यामुळे कांद्याचे घटते दर, निर्यातीवरील निर्बंध यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आता काही संकटांचा सामना करावा लागणार आहे.

कांद्यच्या बाबतीत योग्य निर्णय घेण्याची गरज

मध्यंतरी कांद्यास चांगला भाव मिळत होत तयामुळे शेतकऱ्यांनी खरिपातील लाल कांद्याची रात्रीतून काढणी, कापणी करून बाजारपेठेमध्ये विक्री सुरु केली होती.
त्यानंतर लाल कांद्याची आवक सुरु असतांनाच उन्हाळी कांद्याचे बाजारामध्ये आगमन झाल्यामुळे सर्वकाही थोडे बिघडले आहे. त्यामुळे कांदा निर्यातीबाबत काही धोरण करण्याची मागणी शेतकरी संघटना करत आहेत.

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *