कांद्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले, जाणून घ्या आजचे दर
भारतामध्ये मोठ्या प्रमाणात कांद्याचे उत्पादन घेतले जाते. तर त्यातील अधिक कांदा निर्यात केला जातो. यंदा कांद्याची आवक जास्त झाल्यामुळे तसेच अवकाळी मुळे कमी दर्जाचा कांदा आल्यामुळे कांद्याच्या दरात घसरण होतांना दिसत आहे.
होळीच्या सणाअगोदर लाल व उन्हाळी कांद्यांचे दर एक हजार ते तेराशे रुपयांपर्यंत होते. परंतू सद्यस्थितीत राजस्थान,अलवर, बंगाल आदी राज्यांमध्ये स्थानिक कांदा बाजारात उपलब्ध झाल्याने तसेच देशांतर्गत मागणीतही घट झाल्याने बाजारभावात घसरण झाल आहे.
दरम्यान,होळीआधी लाल कांद्याचे दर ११०० रुपये तर नवीन उन्हाळी कांद्याचे दर १२०० रुपयांपर्यंत होते.
मात्र होळीनंतर तब्बल दीडशे ते दोनशे रुपयांची घसरण झाली असून लाल कांद्यास कमीत कमी ४०१ रुपये,जास्तीत जास्त ९५० रुपये तर उन्हाळी कांद्या कमीत कमी ५०१ रुपये, जास्तीत जास्त १०५० रुपय बाजारभाव मिळाला आहे.
कांद्याचा आजचा दर
१००० ते १२०० रुपयांची घसरण
कांदा पिकापासून मिळणारा नफा तर टूरच परंतू उत्पादनासाठी केलेला खर्चही निघत नसल्याने शेतकरी वर्ग अडचणीत सापडला आहे. सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या तालुक्यातील नांदूरशिंगोटे व दोडी बुट्रक उपबाजारातही गेल्या वीस दिवसांत तब्बल १ लाख ८० हजार क्विंटल लाल कांद्याची आवक झाली होती.
मात्र गत महिन्याच्या तुलनेत तब्बल कांदा दरात १००० ते १२०० रुपयांची घसरण झाली आहे. तर कांद्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे.