पोषक परसबाग उत्तम आरोग्यासाठी…. एकदा वाचाच
नमस्कार बंधू आणि भगिनींनो आपन आपल्या घराभोवती मोकळ्या जागेत केलेल्या भाजीपाला पिकांच्या लागवडीस परसबाग असे म्हणतात. कुटूंबाच्या पोषणविषयक गरजा भागविण्यासाठी परसबागेमध्येच विविध जिवन सत्वे उपलब्ध होणारी फळझाडांची लागवड केलेल्या परसबागेत पोषक परसबाग Nutritional Garden) असे म्हणतात. ह्या पध्दतीत स्वतःच्या कुटूंबाला दररोज लागणाऱ्या आणि शरीरास आवश्यक असणाऱ्या आवडणाऱ्या सेंद्रिय भाजीपाला पिकांची लागवड केल्या जाते.
आहारतज्ञाच्या शिफारशीनुसार दर माणसी २८० ग्रॅम भाजीपाला व १२० ग्रॅम फळांची शरीराला गरज असते, परंतु हाच दर आपल्या देशात १२० ग्रॅम भाजीपाला व ४० ग्रॅम फळे इतका आहे. त्यामुळे परिसरातील ह्या पोषक परसबागेचे योग्य नियोजन केले तर शरीरासाठी आवश्यक असलेले जिवनसत्वे, क्षार, कर्बपदार्थ व प्रथीने उपलब्ध होवू शकतात. एकुण २० x २० चौरसमीटरच्या बागेतुन कुटूंबातील सहा सदस्यांना वर्षभर भाजीपाला मिळू शकतो. पोषक परसबागेचे उद्दीष्टे :
सावकारांचे कर्ज टाळायचे असेल तर तुम्ही KCC लगेच बनवा फक्त 3%टक्के व्याज, ही आहे संपूर्ण प्रक्रिया
ताज्या, विषमुक्त फळे व फळभाज्या, पालेभाज्याचा दैनंदिन आहारात उपयोग करुन समतोल आहार घेणे. परसातील मोकळी जागा व सांडपाणी ह्यांचा सुयोग्य वापर करणे. कुटूंबातील सहज स्वस्त पध्दतीने सुरक्षित भाजीपाला व फळांची उपलब्धता करणे. पोषक परसबागेचे फायदे :
थोड्या जागेत जास्त काळजीपुर्वक मशागत करुन भाजीपाला पिकांची लागवड केल्यास आपल्या कुटूंबाला समतोल आहार निळातो, फळे आणि भाजीपाल्यामध्ये शरीराला आवश्यक असणारी जीवनसत्वे आणि खनिज असतात त्या फळांची व भाज्यांची घरच्या घरी लागवड केल्यास ती विकत घ्यावी लागत नाहीत आणि बाहेरीत किटकनाशक फवारलेली व कृत्रीमरीत्या पिकविलेली महागडी फळे व भाजीपाल्यापासुन होणारे दुष्परिणाम टाळून पैशांची बचत होते.
UIDAI: आता पोस्टमन तुमच्या घरी येऊन बनवेल आधार कार्ड, महिलांना घरपोच मिळणार ९०% सेवा
त्यासोबतच आपल्या कुटूंबाला ताज्या आणि उत्तम प्रतीच्या भाज्या आणि फळे मिळतात. आपल्या कुटूंबाला लागणारी भाजी आणि फळे आपणच तयार केली आहेत ह्याचा आंनदही वेगळाच असतो. घरातील लहान मोठ्यांना फावल्या वेळेचा सदुपयोग करुन श्रमाचे महत्व कळते विविध भाज्या फळझाडे ह्यामुळे घरातील कुटूंबांचे आरोग्य सुदृढ होवून प्रतिकारशक्ती वाढीस लागते व पर्यायाने डॉक्टरवर होणाऱ्या खर्चात कपात होते.
परसबागेसाठी आवश्यक घटक :
परसबागेसाठी आखणी करतांना उपलब्ध क्षेत्र, जमिनीचा प्रकार, पाणी पुरवठ्याची व्यवस्था, हवामान आणि हंगाम ह्या घटकांचा प्रामुख्याने विचार करावा.परसबागेसाठी मध्यम निचऱ्याची जमिन आवश्यक आहे. जर जमिन अत्यंत हलकी असेल तर १५-२० से. मी. उंचीचा थर पोयटा मातीने बदलवून घ्यावा व संपुर्ण जमिन समपातळीत करुन घ्यावी.
पाणी :
परसबागेसाठी पुरेसे पाणी असल्यास फार उत्तम तसेच यांच्याकडे पाण्याची पुरेशा प्रमाणात उपलब्धता नसेल त्याना आपल्याकडे असणाऱ्या सांडपाण्यावरसुध्दा परसबागेचे उत्तम नियोजन करते येते. बऱ्याच भाजीपाला पिकांचे उत्पादन सव्वा ते दिड | महिन्यात सुरु होत असते. त्यामुळे यांच्याकडे पाणी नसेल, परंतु जागेची उपलब्धता असेल त्यांनाही जुन ते सप्टेंबरपर्यंत परसबागेची आखणी करता येईल. परसबागेचे नियोजन
शेतीतील उत्पादन वाढवायचे आहे, मग हे नक्की कराच…
प्रथम जागेची आखणी करतांना शक्यतोवर चौकोनी पध्दतीचा बाग आखावा. आखणी तर बागेची जमिन चांगली उखरुन घ्यावी. उखरी १५ ते २० सें.मी. खोल घ्यावी. कडक किंवा दगड गोट्यांचा समावेश असणारी असेल तर १५ ते २० सें.मी.चा नदीकाठच्या गाळाच्या मातीचा थर दयावा, त्यामध्ये प्रती चौरस मीटर १ टोपले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत मिसळवून घ्यावे. परसबागेची जमिन तयार झाल्यानंतर | बागेच्या कुपणाची सोय करावी. तारेचे कुंपण केल्यास त्यावर वेलवर्गीय भाज्यांची लागवड करता येते. सजिव कुंपणाचा विचार केल्यास मेहंदी / करवंदाचा विचार करावा.
सर्वसामान्यपणे घराच्या उत्तरेला जास्त काळ सावली राहते. ह्या भागात सावलीत येणाऱ्या पालेभाज्यांची लागवड करावी. पुर्व पश्चिम आणि दक्षिणेकडील भागाला बराच काळ सुर्यप्रकाश आणि उबदार तापमान मिळते. ह्या ठिकाणी फळझाडे आणि फळभाज्यांची लागवड करावी. जेणेकरुन वारा प्रतिरोधके म्हणुन ही फळझाडे उपयोगी पडू शकतात. पालक, आंबटचुका, कोथींबीर, चाकवत इत्यादी पालेभाज्यांची लागवड सरींच्या वरंब्यावर, टोमॅटो, मिरची वांगी ह्या पिकात आंतरपीक म्हणुन सुध्दा करता येते. मुळा, गाजर, बीट ह्यासारखी मुळवर्गीय भाजीपाल्याची पिके वाफ्यांमध्ये जे वरंबे असतात त्या वरंत्र्यावर घेता येतात.
फळभाजीपाल्याची लागवड दोन पध्दतीने केली जाते. वांगी, मिरची टोमॅटो, कोबी, पानकोबी अशा भाज्यांची रोपे तयार करुन त्यांचे स्थलांतर केले जाते, तर गवार भेंडी, मिरची तसेच वेलवर्गीय भाज्या आणि पालेभाज्या ह्यांची लागवड बियांपासुन करतात. ह्याला लागणाऱ्या पाण्याच्या पुर्ततेसाठी घरातील तांदूळ, डाळी, भाज्या धुतलेले पाणी तसेच भांडी धुतलेले पाणी देखील झाडांसाठी वापरु शकतो.
मशागत :
परसबागेतील जमिनीची लागवडीपुर्वी मशागत करणे आवश्यक असते. त्यालाच पुर्व मशागत असे म्हणतात.पुर्वमशागत करण्यासाठी वेगवेगळी अवजारे वापरुन जमिनी खोलवर मऊ आणि भुसभुशीत करावी. पुर्वीच्या पिकांचे अवशेष काढून टाकावेत. जमिन समपातळीत करणे किंवा तिला विशिष्ट बाजुस उतार देणे ही कामे करुन घ्यावीत. पिकवाढीच्या काळात दोन ओळीतील माती हलवून तणे काडून टाकावीत. या मशागतीसाठी कुदळी, फावडे, दातेरी कोळपे, खुरपे, हातपंजे, घमेले ह्या अवजारांचा वापर करावा. बागेसाठी वापरावयाची हत्यारे काम झाल्यानंतर स्वच्छ करावीत म्हणजे ती गंजणार नाहीत, तसेच अवजारांमार्फत रोगाचा प्रसार होणार नाही. बागेत काम करण्यासाठी उभ्याने काम करता येईल अशी अवजारे निवडावीत त्यामुळे श्रम कमी लागतात.
ग्राहक सेवा केंद्र: CSP ऑनलाइन नोंदणी, ग्राहक सेवा केंद्र कसे उघडायचे?
बियाणे :
दुकानात चांगल्या जातीवंत बियाण्यांचे पाकीटे मिळतात. बुरशीनाशकाची प्रक्रिया केलेली असते. एकदल वर्गीय भाजीपाल्यास अॅझोटोबॅक्टर व ह्या बियाण्यास ॲझोस्पीरीलम आणि व्दिदलवर्गीय (शेंगवर्गीय) भाजीपाल्यास रायझोबियम जिवाणू संवर्धक चोळल्यास पिकास फायदा होतो. परसबागेत लागवडीसाठी बियाणे अतिशय अल्प प्रमाणात लागते. कृषि सेवा केंद्रावर किरकोळ विक्रीकरीता बियाणे उपलब्ध असते, तसेच नजीकच्या कृषि विज्ञान केंद्रामध्ये अगोदर मागणी नोंदविल्यास तेथे खात्रीचे संपुर्ण बियाणे किट उपलब्ध होवू शकते. काही भाजीपाल्याचे बी घरच्या घरी तयार करता येते फक्त संकरीत वाणाचे बी किंवा तयार रोपे खरेदी करावीत. परसबागेत वेळोवेळी लागवड करतांना दाटीवाटीने लागवड न करता, बटाटा, कांदा, कोबी, फुलकोबी ह्यासारखी एकाच वेळी निघणारी भाजी टाळावी. दररोज लागणाऱ्या पालेभाज्यांचा अग्रक्रमाने समावेश करावा.
जसे एकाच प्रकारची भाजी न लावता ४ ते ५ प्रकारच्या भाज्यांची लागवड करावी. परसबागेत रोपे स्थलांतर करतेवेळी ती निरोगी जोमदार ३ ते ४ आठवड्यांची,१५ ते २० सें.मी. उंच व ४ ते ६ पाने असणारी असावीत रोपे वाफ्यातुन किंवा ट्रेमधुन काढण्यापूर्वी २४ तास आधि वाफ्याला / ट्रेला पाणी दयावे, म्हणो रोपे अलगद उपटून काढता येतील. वाफ्यातील रोपे काढण्यासाठी लांब सळई खुपप्याचे टोक किंवा ट्रा सप्लँटींग टॉवेलच्या मदतीने रोपे अलगद उपटून काढावीत. मातीच्या गोळ्यासहीत रोपे काढल्यास मुळ्यांना इजा होणार नाही. ढगाळ हवामान असताना किंवा संध्याकाळच्या वेळी पुर्नलागवड करावी व लगेच पाणी दयावे. अशा रितीने वांगी, मिरची, टोमॅटो, कांदा कोबी, फ्लावर इ. ची रोपे तयार करुन लावू शकतो. हंगामानुसार भाजीपाला लागवड :
भाजीपाला लागवडीसाठी हंगामाप्रमाणे योग्य भाज्यांची लागवड करावी.
अ) खरीप हंगामातील भाजीपाला (पावसाळी हंगाम जुन ते सप्टेंबर)
टोमॅटो, मिरची, ढोबळी मिरची, वांगी, भेंडी, गवार, कांदा, बटाटा, श्रावण घेवडा, चवळी, मेथी, पालक, चाकवत, पोकडा, चुका, कोथींबीर, अंबाडी, राजगिरा शेपू, माठ, पुदिना, तांदुळना, आळू, चंदनबटवा, मुळा ई.
वेलवर्गीय भाज्यांमध्ये दोडका, तांबडा भेपळा, दुधी भोपळा, दोडकी, तोंडली, कारली, काकडी, पडवळ, डबलबीज, दाल ह्यांचा समावेश करावा.
ब) रब्बी हंगाम :
(हिवाळी हंगाम ऑक्टोंबर ते जानेवारी)
पत्ताकोबी, फुलकोबी, बीट, वाटाणा, बाजर, कांदा, बटाटा, मुळा, वांगी, टोमॅटो,
मिरची, चाकवत, चुका, मेथी, शेपू, कोथींबीर, इत्यादी.
जानेवारी महिन्यात कलींगड, खरबुज, काकडी, दुधी भोपळा, दोडका, गाजर, मुळा,
क) उन्हाळी हंगामातील भाजीपाला (उन्हाळी हंगाम फेब्रुवारी ते मे) पालक, अंबाडी, मेथी, मिरची, टोमॅटो, भेंडी, गवार, घेवडा, चवळी, कोथींबीर, चुका, चाकवत, पोकळा, करडई, चवळी, ह्यांची लागवड करावी. भाजीपाल्याची लागवड करण्याच्या विविध पध्दती:
१) मिश्र पिक पध्दती:
थोडा जागेतुन अधिक भाजीपाला घेण्यासाठी ही पध्दतीत वापरावी. ह्या पिक पध्दती वरंब्यावर कोथींबीर, मका, लसुण, आले, मुळा, भुईमूग, आंबटचुका इत्यादींची लागवड अंतराअंतरावर करुन मिश्र पिक पध्दतीचा फायदा घेता येतो. तसेच वरंब्यावर मुख्य पिकाची लागवड केली असल्यास सरीमध्ये कोथिंबीर, मेथी, चाकवत हयासारख्या पालेभाज्या घेता येतात.एका पिकाच्या हंगाम संपत आल्याचे लक्षात येताच मोकळ्या जागेत दुसऱ्या पिकाचे बियाणे टाकुन ते उगवुन येताच पुर्वीची झाडे काढून टाकावी.
ह्या पिक पध्दतीत वांगी टोमॅटो, मिरची ह्या पिकांचा हंगाम संपत आल्याचे लक्षात येताच मोकळ्या जागेत भेंडी, गवार, घेवडा ह्या पिकांचे बियाणे टाकावे. ते उगवुन येताच वांगी, टोमॅटो, मिरचीची झाडे काढून टाकावीत.
३) आंतरपीक पध्दत:
ह्या पध्दतीत वाफ्यातील मुख्य पिकांचे अंतर थोडे कमी करुन मुख्य पिकांच्या दोन ओळीनंतर तिसरी ओळ आंतरपिकाची घ्यावी. परसबागेतील किडींचे नियंत्रण
परसबागेत मुख्यतः भाज्यांची पिके असतात. त्यांचे किडींपासुन नुकसान होते. या किडींच्या नियंत्रणासाठी रासायनिक विषारी किटकनाशकांची फवारणी करता येत नाही. कारण दररोज भाज्या खाण्यासाठी लागतात. शिवाय परसबागेत लहान मुले व पाळीव प्राणी फिरत असतात. पिकांचे मुख्यतः किटकांच्या अळ्यांपासुन नुकसान होते. अळ्या खादाड असतात. अळ्यांचे कोषावस्थेत रुपांतर होते. कोषावस्थेत किटक सुप्तावस्थेत असल्याने काहीच खात नाहीत. हे कोष झाडांवर टांगलेले असतात, किंवा जमिनीत असतात. जमिनीची खुरपणी केल्याने कोष उघडे पडतात. अळ्या व कोष पक्षी (चिमण्या, कावळे) इ. खातात. अळ्यांचा नाश परजीवी किटक व भक्षक किटक करतात. रासायनिक किटकनाशकांच्या फवारणीने त्यांचाही नाश होतो. कोषातुन काही दिवसांनी प्रौढ किटक निघतो. नर व मादीचा समागम झाल्यानंतर मादी पिकांवर अंडी घालते.
परसातील पिकावर खालील अनेक प्रकारचे किटक आढळतात.
१) चावुन खाणारे किटक: हे किटक झाडांची पाने, खोड, मुळ्या, फुले व फळे चावून खातात. त्यामुळे झाडांची पाने कातरल्यासारखी दिसतात किंवा पानांवर भोके दिसतात. उदा. पतंगाच्या अळ्या, भुंगेरे इ.
२) रस शोषणारे किटक:
झाडाच्या कोवळ्या भागातील (पाने, खोड व फळे) रस हे किटक शोषतात. बहुदा
हे किटक बारीक असतात आणि वसाहत करून बहुसंख्येने असतात. उदा. मावा, फुलकिडे,
तुडतूडे, माशा, ढेकण्या, खवले किटक, कोळी (माईट).
परसबागेतील महत्वाच्या किडींचे सुलभपणे कसे नियंत्रण करावे याची माहिती खाली दिली आहे.
३) मावा किटक (Aphids)
जेव्हा परसबागेतील झाडांची पाने व खोड फिकट व निस्तेज दिसतात, तेव्हा समजावे कि त्या झाडांवर मावा किटक आहेत. मावा किटक आपल्या शरीरातुन गोड रस बाहेर टाकतात. तो खाण्यासाठी मुंगळ्यांची रांग लागते. झाडांवर मुंगळे दिसले कि समजावे तेथे मावा किटकांची वसाहत आहे. झाडांच्या रंगाप्रमाणे मावा किटक आपला रंग बदलतात आणि शत्रुपासुन संरक्षण करतात. बहुदा पानांच्या खालील बाजुंवर मावा किटकांची वसाहत असते. म्हणुन फवारणी करण्याने काही लाभ होत नाही. जर व मादीचे समागम न होताच मावा किटकांची पिले जन्मतात. प्रौड मावा किटक विनापंखांचे असतात. पिकातील अन्न संपले की त्यांना पंख फुटतात आणि ते दुसऱ्या पिकावर उडून जातात. प्रौढ किटक व त्यांची पिले पिकातील रस शोषतात. त्यांचा जीवनक्रम १२ दिवसांचा असतो. मावा किटकांमुळे विषाणू रोगाचा प्रसार होतो.१) बारीक चिकण माती पाण्यात मिसळावी आणि मावा किटकांवर फवारणी करावी. त्यामुळे मावा किटकांची हालचाल बंद होते. त्यांना श्वास घेता येत नाही.
पालेभा ज्यांवर चिकण माती फवारणे योग्य होणार नाही म्हणून धान्याचे बारीक पीठ (मैदा) पाण्यात मिसळून त्याचे दुधाप्रमाणे पातळ मिश्रण तयार करावे. पानांच्या खालील बाजुवर बसलेल्या मावा किटकांच्या वसाहतीवर या मिश्रणाची सकाळी फवारणी करावी. सुर्यकिरणांनी मिश्रणातील पाण्याची वाफ होते आणि मैद्याचा पानांवर पापुद्रा (पापडी तयार होतो. त्यामुळे मावा किटक हालचाल न करता गुदमरून मरतात. दोन तीन दिवसांनी मैद्याची पापडी मेलेल्या मावा किटकांसह पानावरुन गळून पडते.
२) सिताफळांचया बिया वाटून पाण्यात मिसळाव्या. काही वेळाने बियांचा अर्क कापडातुन गाळून घ्यावा त्या द्रावणाची पिकांवर फवारणी करावी. त्यामुळे मावा, माशा, त्यांच्या अळ्या इ. किटकांचे नियंत्रण होते. पतंग व ३) गुळवेलीची पाने खोड व मुळ्या बारीक चेचून रस काढावा. त्यामध्ये पाणी मिसळून पिकांवर
फवारणी करावी त्यामुळे मावा, माशा, पतंग व त्यांच्या अळ्या इ. किटकांचे “नियंत्रण होते.
४) गोमुत्रात ६ पट पाणी मिसळावे आणि त्याची मावा किटकांवर फवारणी करावी. ४) अळ्या: परसबागेतील पिकांवर अनेक प्रकारच्या पतंगांच्या व फुल पाखरांच्या अळ्या असतात.
पानांच्या खालील बाजुवर ह्या किटकांची अंडी असतात. त्यातुन अळ्या निघतात. ह्या
अळ्या पाने व कोवळ्या फांद्या (खोड) खातात.
मोजमाप:
१) अळ्या वेचुन त्या थोडे केरोसिन घातलेल्या डब्यातील पाण्यात टाकाव्यात म्हणजे मरतात किंवा,
२) केरोसिनमध्ये कापडाचा बोळा भिजवावा आणि त्या बोळ्याचा स्पर्श अळ्यांना आणि अंड्यांच्या पुजकांना करावा. अळया मरतात. अंड्यांतुना अळ्या बाहेर निघत नाहीत.
३) झाडांच्या पानांच्या खालील बाजुवर अंड्यांचे पुंजके शोधावे. अशी पाने तोडुन गोळा करुन ती जाळुन टाकावी.
४) बारा लिटर पाण्यात धुण्याचा सोडा ३ चमचे मिसळावा. पाणी चांगले ढवळावे. म्हणो सोडा पाण्यात विरघळतो. ढवळत असतांना निंबोळीचे तेल ३ चमचे ह्या द्रावणात थेंबथेंब टाकावे. तेल पाण्यात विरघळत नाही. पण थेंब फुटून त्याचे बारीक कण पाण्यात तरंगतात आणि दुधाप्रमाणे पांढरे इमल्शन तयार होते. या मिश्रणाची फवारणी पिकांवर करावी. म्हणजे अळ्यासोबत इतर किडींचेही नियंत्रण होते.५) देठ कुरतडणाऱ्या अळया (Cutworms) :
परसबागेत टोमॅटो, कोबी व इतर भाज्यांची रोपे लावली की रात्री ह्या अळ्या त्या रोपांच्या खोडे जमिनीलगत चावुन खातात. त्यामुळे सकाळी रोपे कोलमडून पडलेली दिसतात. काही जातीच्या अळ्या रोपांच्या खोडावर चढून पाने खातात. त्यामुळे किनारीपासुन आतपर्यंत पाने कातरलेली दिसतात.
उपाय:
१) पत्र्यांच्या डब्याचा तळवा व झाकण कापुन टाकावे. म्हणजे बांगडी तयार होते. ती जमिनीवर ठेवून तिच्या मध्यभागी रोप लावावे. पत्र्याच्या ऐवजी २ इंच रुंद पुट्ट्यांची वेटोळी रोपाभोवती जमिनीवर ठेवली तरी भागते. त्यामुळे अळी रोपाच्या खोडापर्यंत पोहोचत नाही.
२) रोप लावल्यानंतर रोपाच्या खोडाच्या बुंध्याजवळ दात कोरण्याच्या काड्या किंवा आगपेटीतील काड्या किंवा टणक काड्या खोचुन ठेवाव्या. त्यामुळे अळीला रोपाभोवती प्रदक्षिणा घालता येत नाही आणि खोड कातरता येत नाही.
३) ह्या अळ्या रात्री बागेत फिरतात. तेव्हा रात्री विजेरीच्या प्रकाशात ह्या अळ्या गोळा करुन मारुन टाकाव्यात.
४) जेथे रोप कुरतडलेले असते, तेथील माती उकरली तर दिवसा वेटोळी केलेली अळी सापडते. अशा अळया गोळा कराव्यात.
५) परसबागेतील रोपामध्ये ठिकठिकाणी वाळलेल्या गवताचे पुंजके ठेवावेत. सकाळी ह्या पुंजक्यात अळ्या लपलेल्या आढळतात. तेव्हा सर्व पुंजके गोळा करुन जाळून टाकावे.
६) सुत्रकृमी (Nematodes): •उघडया डोळ्यानी न दिसणाऱ्या सुत्रकृमी झाडांच्या मुळ्यांत आपले डोके खुपसन रस शोषतात. काही जातीच्या सुत्रकृमी मुळ्यात गाठी करुन आतमध्ये राहतात. सुत्रकृमीमुळे झाडांची वाढ खुंटते.
उपाय:
१) पिकांचा फेरपालट करावा. तृणवर्गीय पिकांवर सुत्रकृमी नसतात. त्यावेळी जमिनीतील सुत्रकृमी उपाशी राहुन मरतात.
२) जमिनीत निंबोळीची पेंड मिसळल्याने सुत्रकृमींची संख्या घटते आणि पिकाला खतही मिळते. रासायनिक खतामुळे सुत्रकृमींची संख्या वाढते.
३) पिकाला सेंद्रिय खते द्यावीत.
४) परसबागेत मधुन मधुन झेंडूची झाडे लावावीत. झेंडूच्या मुळ्यामुळे सुत्रकृमी मरतात.
५) फळमाशा (Fruitfiles): फळमाशी फळाच्या पृष्ठभागावर अंडी घालते. त्यातुन निघालेल्या अळ्या फळात शिरतात आणि गर खातात. किडलेली फळे (उदा.वांगी, भेंडी) खाण्यास योग्य नाहीत. अशा फळांवर भोके दिसतात.
उपाय:
फळमाशांनी अंडी घालण्यापुर्वीच त्यांचा नाश केला पाहिजे.
एक लिटर पाण्यात दोन चमचे अमोनिया व पाव चमचा साबणाची भुक्टी मिसळावी. एका डब्यात हे मिश्रण भरुन ते झाडाजवळ सुर्यप्रकाशात ठेवावे. डब्यातील मिश्रण दर आठवड्याला किंवा पावसामुळे सौम्य झाल्यास बदलले पाहिजे फळमाशांमुळे झाडांवरुन गळून पडलेली फळे गोळा करुन त्यांचा नाश करावा.
६) पाने पोखरणाऱ्या अळ्या (Leaf miners) : ह्या किडींमुळे भाजी पिकांचे फारसे नुकसान होत नाही. या अळ्या पालकाची व इतर भाज्यांची पाने पोखरतात. पान प्रकाशात धरले की अळीने पोखरलेले बोगदे दिसतात. ह्या बोगद्यात अळी राहते. पुर्ण वाढलेली अळी जमिनीवर पडते आणि जमिनीत कोष तयार करते.
उपाय:
१) जमिनीतील किडींचे कोष कोंबड्या व पक्षी खातात.
२) पुदिना, लसून कांदा यासारखी उग्र वासाची झाडे भाजी पिकात असली की त्यापासुन प्रौढ किटक लांब राहतात.
३) पानांवर लाकडाची राख धुरळल्याने ह्या किडींची माशी त्या पानांवर बसत नाही.अंडी घालत नाही.
७) खोड पोखरणाऱ्या अळ्या (Stem borers) : ह्या अळ्या खोडाच्या गाभ्यात राहुन आतील भाग खातात. तेथेच वाढतात. त्यामुळे झाडाचा शेंडा सुकतो. त्यावरुन ह्या किडींचा प्रादुर्भाव झाल्याचे ओळखता येते. खोडाच्या आत अळी राहात असल्याने वरुन काही उपाय चालत नाही. अशी झाडे उपटून जाळून टाकावी. वांग्याच्या झाडाचा शेंडा सुकलेला दिसल्यास तो वरुन खालपर्यंत बोटांच्या चिमटीत दाबत जावा. म्हणजे शेंड्यातील अळी मरते.
८) पिठ्या ढेकण्या (Mealy bugs) :
हे खवले किटक झाडाच्या खोडावर असतात आणि खोडातील रस शोषतात. त्यामुळे फार नुकसान होते. त्यांचे नियंत्रण करणे अवघड असते. कारण त्यांच्या शरीरावर मेणाचे आवरण असते. त्यामुळे किटकनाशकाचा परिणाम त्यांच्यावर होत नाही.
उपाय:
१) कापसाचा बोळा पेट्रोल किंवा स्पिरीटमध्ये भिजवावा. त्या बोळ्याने प्रत्येक मिलीबगला स्पर्श करावा. त्यांच्या शरीरावरील मेणाच्या आवरणातुन स्पिरिट आत शिरते आणि किड मरते.
११) मुळांची माशी (Root maggot flies) :
माठ, कांदा, कोबी इ. पिकांच्या मुळ्यात प्रौढ माशी अंडी घालते. अंड्यातुन निघालेल्या अळ्या मुळ्यात शिरतात. त्यामुळे रोप कमजोर बनते.
उपाय:
रोपांच्या खोडाभोवती भरपूर राख जमिनीवर पसरावी. राख पावसाच्या पाण्याने धुवन गेली तर | पुन्हा त्या ठिकाणी चुलीतील ताजी राख घालावी. ह्या उपायाने देठ कुरतडणाऱ्या अळ्या व गोगलगार्थीचेही नियंत्रण होते.
१२) काकडीवरील ढेकण्या (Dquadh bugs) :
प्रौढ मादीने घातलेल्या अंड्यांतुन करड्या रंगाची, लठ्ठ शरीराची व काळ्या पायांची पिले निघतात ही पिले काकडीचा रस शोषतात.
उपाय:
१) अंडी शोधुन त्यांचा नाश करावा.
२) पिकांच्या ओळीत पातळ सपाट पुठ्ठा किंचित तिरपा ठेवावा. त्याच्याखाली हे किटक जमा होतात. त्यांना चिरडून मारावे.
३) कळीचा विरलेला चुना (भुकटी) व लाकडाची राख यांचे मिश्रण वेलींवर शिंपडावे.
१३) पांढरी माशी (White Flies) :
पांढरी माशी मावा किटकाप्रमाणे बारीक असते. ती बारीक पतंगाप्रमाणे दिसते. या माशीची पिले पानांच्या खालील बाजुवर राहात असल्याने त्यांच्यापर्यंत किटकनाशकांचा फवारा
| पोहोचणे अवघड असते. म्हणुन अनेकदा उपचार करावा लागतो. उपाय:
१) तंबाखुची भुकटी पिकावर धुरळावी.
२) तंबाखुचा काढा करावा व त्यात थोडा साबण मिसळून ते मिश्रण पिकावर फवारावे. ३) पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव जास्त असल्यास केरोसिन इमल्शनची फवारणी करावी..
परसबागेसाठी किटकनाशके:
परसातील किडींचे नियंत्रण करण्यासाठी खालील किटकनाशके घरीच तयार करता येतात. ही किटक नाशके सर्व प्रकारच्या किटकांकरीता उपयोगी पडतात.
धन्यवाद……!
डाॅ प्रणिता कडु (काकडे)
MSc,M.a,B.ed,phD विषय विशेषज्ञ गृह विज्ञान
कृषी विज्ञान केंद्र घातखेड अमरावती १.
माहिती संकलन.
मिलिंद जि गोदे
save the soil all together
संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे इंदापूरातील ठिकाण बदलले, ‘हे’ असेल नवीन ठिकाण