शेतकऱ्याने केले नवीन वाण विकसित !
जसा जसा काळ बदलत आहे तसतसा शेतकरी देखील आधुनिक पद्धतीचा वापर करत असून विविध प्रयोग करत आहे. तसेच अनेक तरुणांचा कल देखील शेतीकडे जास्त वाढत आहे. त्यामुळे अनेक तरुण विविध प्रयोग करून त्यांच्यातील गुण दाखवत आहेत. असाच एक प्रयोग दौड तालुक्यातील पाटस गावामधील तरूणाने कांद्यावर प्रयोग करून आपल्या स्वतःच्या नावाची कांद्याची वाण विकसित केली आहे. या वाणाची टिकून राहण्याची क्षमता ही ७ ते ८ महिने इतकी आहे. या वाणाची सध्या सोशल मीडिया वर जोरदार चर्चा सुरु आहे. संदीप कांद्याची जात शेतकऱ्यांसाठी फायद्याची असल्याने अनेक शेतकरी संदीप सोबत जोडले गेले आहेत. या जातीची लागवड केल्यास उत्पादन जास्त होत असून उत्पादनासाठी लागणार खर्च कमी झाला आहे.
कसा लागला नवीन वाणाचा शोध?
अनेकदा कोणत्याही पिकाची लागवड करत असतांना बियाणे खरेदी करतांना शेतकऱ्यांची फसवणूक केली जाते. त्यांना अत्यंत खालच्या दर्जाचे बियाणे दिले जातात. त्यामुळे संदीप घोले यांनी स्वतःच कांद्याचे वाण विकसित केले आहे. त्याला कांदा दीर्घकाळ टिकवून ठेवले अत्यंत कठीण जात होते. कांदा लवकरच खराब होत होता. त्यावर पर्याय म्हणून त्याने जवळ जवळ ८ वर्षे संशोधन केले. त्यानंतर संदिप कांदा वाणाची निर्मिती केली आहे. या नवीन वाणामुळे त्याच्या उत्पन्नात हेक्टरी ७ ते ८ टनाचा फरक पडला आहे.
या वाणात काय आहे वेगळेपणा ?
संदीपच्या आगळ्या वेगळ्या प्रयोगाची चर्चा सगळीकडे होत आहे. एवढेच काय तर नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशनने याची दखल घेतली आहे. हा कांदा इतर कांद्यापेक्षा ४ ते ५ महिने अधिक काळ टिकतो. याचा शेतकऱ्यांना जास्त प्रमाणात फायदा होणार आहे. या कांद्याची गुणवत्ता देखील चांगली असल्यामुळे यास उत्पन्न चांगले मिळत आहे.