नैसर्गिक शेती म्हणजे शक्य व सहज शेती…..एकदा वाचाच
मिलिंद जि गोदे – नैसर्गिक पर्यावरणात राहून निसर्गाच्या सहकार्याने करायची शेती. शेतीमधील तण हे आपले शत्रू नसून अत्यावश्यक सूक्ष्म घटक पुरवणारे मदतनीस आहेत. निसर्गाच्या सानिध्यात राहिल्याने आकाशाची निर्मळ विशालता, हवेची मुक्त प्राणदायिता, पाण्याची शीतलता व प्रवाहितता, प्रकाशाची तेजस्विता व अंध:कार निरसनता, भूमीची क्षमताशीलता, दानशूरता व उत्पादकता यांचा परिचय होतो. एका दाण्याचे शंभर दाणे करणाऱ्या सृष्टीच्या निर्मात्याबद्दल श्रध्दा व कृतज्ञता या सर्वांचा समावेश होतो. “शेतकऱ्यांचे जीवन हेच सर्वश्रेष्ठ जीवन आहे. जो आपल्या जमिनीत पैदास करून खातो, तो या देशाचा सरसेनापती बनला, प्रधानमंत्री बनला तर हिंदुस्थानचा चेहरामोहराच बदलून जाईल.परंतु या विचाराची दखल कुणी घेतली नाही. पाश्चात्य देशाची आधुनिक विज्ञानाने आमचे डोळे दिपले. आम्ही त्यांची गुलामगिरी स्वीकारली. हे मान्य करावे लागेल.त्या संस्कृतीचा पाया ‘अधिकाधिक ओरबाडून घेणे’ हाच होता.
नॅनो-डीएपीला एक वर्षासाठी तात्पुरती मंजुरी !
मातीला जड, मृत मानून सर्व रचना केली गेली. जिवंत व चैतन्याने रसरसलेल्या मातीशी सैतानी खेळ सुरू झाला. माणसाच्या हव्यासाने आणि अत्याचाराने ही माती खरोखर मृत बनू लागली. याचा परिणाम पिकांवर, पाण्यावर, हवेवर, जनावरांवर व माणसावर दिसला. सर्वच प्रश्नांनी राक्षसी व रौद्र स्वरूप धारण करायला सुरुवात केली. नंतर आज सर्वत्र सेंद्रिय शेतीचा विचार प्रबळ झाला. यशस्वी नैसर्गिक, सेंद्रिय, शाश्वत शेतीचा पाया जमीन हा आहे. या जमिनीला जीवसृष्टीला खायला घालणे हे सूत्र निर्माण झाले. जमिनीत मूलत:च खनिजे, अन्नद्रव्ये, सेंद्रिय पदार्थ, पाणी आणि हवा असतात. हे सर्व घटक पिकांना उपलब्ध करून देण्याचे काम सूक्ष्म जीवजिवाणू तसेच गांडुळे करत असतात.
देशातील साखर उत्पादनात वाढ, आतापर्यंत 12 दशलक्ष टनांचा टप्पा ओलांडला
या पार्श्वभूमीवर आदर्श जमीन कशी असावी, याचा विचार करता आदर्श जमीन सहजपणे नांगराने नांगरता येणारी, पाण्याचा निचरा होणारी, सखोल अशी असावी. त्यामध्ये पाच टक्के ह्यूमस, ४०-५० टक्के खनिजे, २५-३० टक्के पाणी, २५ टक्के हवा असावी. १०-१५ टन वा सेंद्रिय पदार्थ असावेत. १ ग्रॅम मातीमध्ये जवळजवळ ५० लाख सूक्ष्म जिवाणू असतात. ४० आरमधील जिवाणूंचे वजन सुमारे ४ टन भरते. त्यामध्ये लाख-दीड लाख गांडुळे असतात. त्यामध्ये हवेतील नत्र स्थिर करणारे जिवाणू, मातीतील स्फुरद, पलाश व इतर सूक्ष्म अन्नघटक उपलब्ध करून देणारे घटक, पिकाच्या मुळासाठी पाणी, अन्नघटक, संजीवके मिळवणारी त्याचप्रमाणे मुळांकडे ताम्र, लोह, स्फुरद व कॅल्शियम नेणाऱ्या मायकोरायझा बुरशी याचा समावेश असतो. या बुरशीच्या विशिष्ट स्त्रावामुळे मातीमधून वाढणारे रोग नष्ट होतात.
पेरू गोड आहे की नाही हे कसे ओळखावे? ही युक्ती समजून घ्या
या सर्व घटकांचे पोषण विविध प्रकारचे सेंद्रिय पदार्थ वापरून होते. सेंद्रिय पदार्थामुळे व त्यामुळे वाढणाऱ्या जीवसृष्टीमुळे मातीमध्ये हवा खेळती ठेवली जाते. हवा, पाणी, सेंद्रिय पदार्थ, माती व मातीतील जीवसृष्टी यांच्या एकमेकांवर होणाऱ्या क्रियांमुळे मातीत ह्यूमस नावाचा पदार्थ तयार होतो. त्यातील ह्यूमिक अॅसिड मातीतील मुरुम, दगड यातून सूक्ष्म द्रव्ये वनस्पतीला मिळवून देतात. यामुळे मातीत असलेले अन्नघटकांचे दरवाजे वनस्पतींना मुक्तपणे वापरायला मिळतात. पर्यायाने वनस्पतीचे पोषण होते. वनस्पतीची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. अठराव्या शतकात ह्यूमस हे वनस्पती पोषणास आवश्यक आहे असे प्रतिपादन सुरू झाले. १९ व्या शतकाच्या सुरुवातीस पीक वाढीस कर्बद्विप्राणिल वायू व प्राणवायू आवश्यक आहेत असे शास्त्रज्ञांनी दाखवून दिले. १९ व्या शतकाच्या मध्यावर लिबिग या जर्मन शास्त्रज्ञाने शेतीसाठी रसायनाशास्त्राचा उपयोग केला.
पपईच्या दराबाबत व्यापारी करत आहेत मनमानी, सरकारने भाव निश्चित करण्याची शेतकऱ्यांची मागणी
मायक्रोरायझा व इतर बुरशींचे आणि सूक्ष्म जिवाणूंचे शेतीमधील महत्व इंदूर पध्दतीमुळे जगभर पसरले. पहिले निष्कर्ष आफ्रिकेत, केनियामध्ये, टांझानियात १९३५ सुमारास प्रसिध्दझाले. त्यानंतर त्यांचे भाषांतर स्पॅनिश भाषेत झाल्यामुळे ही प्रक्रिया लॅटिन अमेरिकेपर्यंत पोचली. त्याचवेळेला चहाच्या मळ्यासाठी या पध्दतीचा वापर सुरू झाला. पाहता पाहता पाच वर्षात मिलियन टन ह्यूमसची निर्मिती चहा इस्टेट कंपन्यांनी केली. ह्यूमस तयार करण्याची इदूर पध्दत जंगलामध्ये नैसर्गिक पध्दतीने प्रगत देशात अमोनियम सल्फेटची निर्मिती झाली होती. ह्यूमसबरोबर त्याचेही प्रयोग चहाच्या मळ्यात घेण्यात आले होते.
शेतकऱ्याने स्वत:ला जमिनीत गाडून केली निदर्शने
जमिनीची सुपिकता माती, खेळती हवा, पाणी, सूक्ष्म जिवाणूतील क्रियाशीलता, संख्या इत्यादी विविध गोष्टींवर अवलंबून असते. हे चक्र नैसर्गिकरित्या परिपूर्ण आहे. परंतु मानवाने त्यामध्ये रासायनिक खते, जास्त पाणी आणल्यामुळे सुपिकतेचे चक्र बिघडलेले आहे. त्यामुळेच जगामध्ये शेतीच्या पर्यावरणाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला. भारतामध्ये पडीक जमिनीचे क्षेत्र जवळ जवळ निम्मे आहे. निसर्ग त्याला मंजूर नसलेली पिके, तणे व इतर वनस्पती रोगराईमुळे नष्ट करतो. यावर मात करण्यासाठी कीड व रोगाचे जीवनचक्र अभ्यासण्याची स्पर्धा सुरू झाली. कीड रोगांचे नैसर्गिक शत्रू शोधण्याचा प्रयत्न सुरू झाला. रासायनिक कीटकनाशके, बुरशीनाशके निर्माण झाली. जमिनीची सुपिकता व रोग, कीड यांचा जवळचा संबंध आहे. हे अलिकडे अनेक प्रयोगावरून सिध्द झालेले आहे.
बायोडायनॅमिक शेतीही महत्त्वाची ….एकदा वाचाच
यावर उपाय म्हणून शाश्वत शेतीची कल्पना पुढे आली. कमी खर्चाची, प्रतिच्या दृष्टीने सर्वोत्तम उत्पादन देणारी, जास्त किफायतशीर उत्पादन देणारी, खाद्य पदार्थांमध्ये विषारी रसायनांचे कमीतकमी अंश असणारी आणि पर्यावरणावर कमीतकमी अनिष्ट परिणाम करणारी शेतीपध्दती भविष्यात अवलंबावी लागणार आहे. त्यामध्ये नैसर्गिक साधनसंपत्तीचा चांगला वापर करून जास्तीत जास्त निव्वळ नफा देणारी शेतीच भविष्यकाळात शाश्वत शेती होऊ शकेल…… धन्यवाद
Save the soil all together
मिलिंद जि गोदे
युवा शेतकरी
milindgode111@gmail.com
कृषी जिवन समुह महाराष्ट्र
1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2023 पर्यंत तांदूळ, गहू आणि भरड धान्य मोफत देणार सरकार
आधारमध्ये पत्ता अपडेट करायचा असेल तर आता घरच्या प्रमुखाची संमती घ्यावी लागणार