म्हशींच्या व्यवस्थापनासाठी काही टिप्स
महाराष्ट्रात प्रामुख्याने मराठवाडी, पंढरपुरी आणि नागपुरी यातीन जाती आढळतात. दुधाळ म्हशींना प्रति किलो दुग्धोत्पादनासाठी लागणारे अन्नघटक गाईंना लागणा-या अन्नघटकांपेक्षा अधिक असतात. याचे कारण म्हणजे म्हशींच्या दुधामध्ये स्निग्धांशाचे प्रमाण गाईच्या दुधापेक्षा जास्त असते.दूध मिळण्यासाठी सर्वसाधारणतः ४०० किलो वजन असलेल्या म्हशीस दररोज २५ किलो हिरवा चारा व आठ किलो कोरडा चारा तिची भूक भागविण्यासाठी शरीर पोषणासाठी द्यावा.म्हशीच्या आहारावर दुधातील स्निग्धांचे प्रमाण आधारित असते. त्यामुळे जितका आहार चांगला तितके दूध उत्पादन देखील चांगले .
टीप –
१. गोठ्यामध्ये पाण्याचा व मलमूत्राचा योग्य निचरा होण्यासाठी उपाय योजना करावी.
२. पावसाळ्याच्या सुरुवातीला म्हशींना घटसर्प,फऱ्याइत्यादी संसर्गजन्य आजारांचा लसी टोचून घ्याव्यात.
३. म्हशी च्या कातडी मध्ये स्वेदग्रंथी अत्यल्प प्रमाणात असल्याने त्यांचे शारीरिक तापमान योग्य राखण्यासाठी प्रखर सूर्यकिरणांपासून त्यांचे संरक्षण करणे गरजेचे असते.
४. गोठा उंचीवर हवेशीर जागी व भरपूर सूर्यप्रकाश येईलअशा ठिकाणी बांधावा.
५. साधारणपणे चारशे पन्नास किलो वजनाच्या म्हशीसाठी ८% स्निग्धांशाचे प्रमाणसात लिटर दूध देण्यासाठी व त्यासाठी सात किलो कडबा कुट्टी,चार किलो सरकी ढेप, अर्धा किलो ज्वारीचा भरडा व ३० ग्रॅम खनिज मिश्रण दील्यास अन्नद्रव्याची गरज पूर्ण होऊन म्हशी दूध देण्यात सातत्य राखतात.
६. योग्य प्रमाणात अन्नद्रव्य पुरविल्यास म्हशी योग्य वेळी माजावर येतातव प्रजननासंबंधी समस्या निर्माण होत नाही.
७. शेतातील उरलेले अवशेष जसे तूस,गव्हाचा भुसा यावर प्रक्रिया करून चांगल्या प्रकारचे खाद्यबनवून त्याचा वापर म्हशीच्याआहारामध्ये करता येतो.
अश्याप्रमाने जर म्हशींची काळजी घेतली तर नक्कीच तुम्हाला जास्त आणि चांगले उत्पादन घेण्यास फायदा होईल.