मेंढ्यांच्या या जातींपासून होते सर्वात जास्त उत्पन्न
आपल्या भारतामध्ये बहुतांश शेतकरी शेती बरोबर जोडीने पशुपालन व्यवसाय करतात तर अनेक लोक प्रमुख व्यवसाय म्हणून देखोल पशुपालन करतात . पशुपालन करतांना नेमक्या कोणत्या जातींची निवड केल्यावर उत्पादन तसेच उत्पन्न चांगले मिळेल हा प्रश्न सर्वांना पडत असतो. आपण आज मेंढीपालन करतांना मेंढीच्या कोणत्या जातींची निवड केल्यास जास्त उत्पादन मिळू शकते हे जाणून घेणार आहोत . महाराष्ट्रामध्ये डेक्कनी, माडग्याळ या जातीच्या मेंढ्याचे पालन जास्त संख्येने केले जाते . लोकर तसेच दुधाच्या व्यवसायातून भरघोस उत्पन्न आपण मिळवू शकतो . देशात आढळणाऱ्या मेंढीच्या जातींची माहिती पुढीलप्रमाणे आहे.
गद्दीमेंढी –
१. या जातीच्या मेंढ्यांपासून आपल्याला वर्षातून तीन वेळा लोकर उत्पादन मिळत असते .
२. या जातीच्या मेंढ्या आकाराने मध्यम असून त्यांचा रंग काळा, पांढरा आणि लाल असा असतो .
३. या जातीतील नरांना शिंगे असतात तर १०-१५ % मादी मेंढींना शिंगे असतात.
४. या जातीच्या मेंढ्या कुल्लू , हिमाचल प्रदेश , उधमपूर आणि कांगडा प्रदेशात आढळून येतात .
मुजफ्फर नगरी –
१. या जातीच्या मेंढ्याचा रंग पांढरा असतो .
२. यांच्या शरीरावर भुरक्या रंगाचे ठिपके असतात.
३. या जातीच्या मेंढ्या दिल्ली , उत्तर प्रदेश , मेरठ , हरियाणा येथे आढळून येतात .
जालौनी-
१. या जातीच्या नर आणि मादी दोघांना शिंगे असतात .
२. या मेंढ्यांचे लोकर मऊ आणि जाड असते .
३. या जातीच्या मेंढ्या झांसी आणि ललितपूर मध्ये आढळतात .
पुंछी-
१. या जातीच्या मेंढ्या पांढऱ्या रंगाच्या असून यांचा आकार छोटा असतो .
२. या मेंढ्या गद्दी जातीसारख्या असतात .
३. या जाती जम्मू प्रांतातील पुंच आणि राजोरी येथे आढळून येतात .
मारवाडी –
१. या जातीच्या मेंढ्यांचा आकार लहान असला तरी यांचे लोकर जड आणि दाट असते .
२. या जाती प्रामुख्याने राजस्थानमधील जोधपूर , पाली , नागौर आणि जाल्लोर येथे आढळून येतात .
वरील शेळ्यांच्या जातीचे तुम्ही पालन केले तर तुमहाला भरघोस उत्पन्न घेण्यास मदत होईल . मेंढीपालन हा कमी खर्चात जास्त उत्पादन देणारा व्यवसाय आहे.