पिकपाणी

मटकी लागवडीची पद्धत

Shares

मटकी सर्वात प्रसिद्ध कडधान्य आहे. मटकीचे मुळस्थान भारत , पाकिस्तान आहे. मटकीचे झुडूप जमिनीलगत पसरते. मटकीच्या बिया पिवळट तपकिरी , पांढरट हिरव्या , ठिपकेदार काळ्या रंगाच्या असतात.

जमीन व हवामान –
१. मटकीस हलकी , मध्यम प्रकारची जमीन चांगली ठरते.
२. पावसाच्या पाण्याचा त्वरित निचरा करणारी जमीन निवडावी.
३. क्षारयुक्त , चोपण , पाणथळ जमिनीत मटकीची लागवड करू नये.
४. कमी पावसाच्या प्रदेशात मटकीची लागवड केली जाते.
५. जमिनीचा सामू ३.५ ते ८.५ दरम्यान असावा.
६. २४ ते ३२ अंश सेल्सिअस तापमान या पिकाच्या वाढीस उत्तम ठरते.
७. या पिकास वार्षिक २०० ते ३०० मी.मी पर्यंत पाऊसाची आवश्यकता असते.

मशागत –
१. जमीन खोल नांगरट करून घ्यावी.
२. पाऊस पडल्यांनंतर उभी – आडवी वखरणी करावी.
३. शेवटच्या वखरणीपूर्वी एकरी ५ ते ६ गाड्या कुजलेले शेणखत टाकावे.
४. काडी , कचरा , धसकटे आदी सर्व वेचून घेऊन शेत तयार करावेत.

बीजप्रक्रिया –
पेरणी करण्यापूर्वी २ ग्रॅम कार्बनडाझिम किंवा २ ग्रॅम थायरम प्रतिकिलो बियाणे अशी प्रक्रिया करावी.

बियाणे –
एकरी ५ ते ६ किलो बियाणे लागते.

पेरणी –
१. पाऊस ६० ते ७० मि .ली पडल्यानंतर जूनच्या अखेरीस पर्यंत पेरणी करावी.
२. या पिकाचा ३.५ ते ४ महिन्यांचा कालवधी असतो.
३. रब्बी हंगामात ओलिताच्या शेतात गहू , हरभरा घेण्यासाठी मटकी पिकाची वेळेत पेरणी करणे गरजेचे ठरते.
४. उशिरात उशिरा ऑगस्ट महिन्याच्या मध्यापर्यंत या पिकाची लागवड करता येते.
५. मटकीची पेरणी पाभरी , तिफण , काकरीने करावीत.
६. दोन ओळीतील अंतर ३० सेमी ठेवावेत.
७. दोन झाडातील अंतर १० सेमी पर्यंत ठेवावेत.
८. पेरणीसाठी ३ ते ४ सेमी खोल खड्डा करावा.
९. उडीद , मूग , सोयाबीन याप्रमाणे पेरणीसाठी प्रत्येकी चौथी , पाचवी किंवा सहावी ओळ खाली ठेवून डवऱ्याच्या फेरीवेळी गाळ पडून घ्यावा.
१०. अश्याप्रकारे पट्टापेर पद्धतीचा वापर केल्यास उत्पादनात वाढ होते.
११. पेरणीनंतर ३० ते ३५ दिवस पीक ताणविरहित ठेवावेत.

खत व्यवस्थापन –
१. पेरणी करतांना ३० किलो डीएपी व १५ किलो एमओपी द्यावे.
२. पेरणी करतांना ८ किलो गंधक प्रति एकरी दिल्यास पीक उत्तम होते.
३. हेक्टरी ५ टन शेणखत द्यावे.

अश्याप्रकारे मटकीची लागवड वेळेत केल्यास मटकीचे अधिक उत्पादन मिळण्यास मदत होते.

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *