इतर बातम्या

मराठवाड्यातील शेतकऱ्यांना मिळणार कमी पाण्यात जास्त लाभ

Shares

हवामानाच्या सततच्या बदलामुळे शेतकऱ्यांनी नवनवीन प्रयोग करण्यास सुरुवात केली आहे. शेतकऱ्यांना आता कमी पाण्यात रेशीम शेतीपासून भरघोस उत्पन्न मिळवता येणार आहे. मराठवाड्यात रेशीम शेती करण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. बीडमध्ये नवीन रेशीम खरेदी केंद्र सुरु करण्यात आले आहे.
मराठवाड्यात विकास महामंडळाचे महारेशीम अभियान सुरु झाले आहे. या अभियानाअंतर्गत रेशीम शेतीचे फायदे त्याचे महत्व पटवून दिले जाते. मराठवाड्यातील जालनाकरांना रेशीम शेतीचे महत्व १५ वर्षांपूर्वीच समजले आहे. या शेतीचा प्रसार व्हावा यासाठी कृषी विज्ञान केंद्राने पुढाकार घेतला आहे. सध्या या जिल्ह्यात ९०० एकर जमीन रेशीम शेती खाली आहे. महारेशीम अभियानात यावेळेस ३०० शेतकऱ्यांनी नाव नोंदणी केली आहे. यामध्ये अजून ३०० नोंदणीची भर पडण्याची शक्यता आहे.

रेशीम कोषास काय आहे भाव ?
राज्यातील पहिली बाजारपेठ जालना बाजार समितीमध्ये सुरु झाली होती. आता बीड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रेशीम कोष खरेदी करण्यास सुरुवात झाली आहे. बाजारपेठेत रेशीम खरेदी केली जात आहे त्यामुळे मराठवाड्यातील शेतकऱयांचा विक्रीचा प्रश्न सुटला आहे. रेशीम कोषास ५५ हजार क्विंटलचा भाव मिळत आहे.

रेशीम उद्योगासाठी आवश्यक असणारे कागदपत्रे –
सरकारी अधिकारी गावोगावी जाऊन इच्छुक शेतकऱ्यांना उत्तम मार्गदर्शन करतात. गावांची निवड ही तहसील कार्यालयातून बागायती क्षेत्र घेतल्यांनंतर केली जाते. इच्छुक शेतकऱयांना सर्वप्रथम नोंदणी करावी लागते. त्यासाठी पुढील कागदपत्रे असणे आवश्यक आहे.
१. सातबारा
२. ८ अ नमुना
३. आधार कार्ड
४. बँक पासबुकची झेरॉक्स
५. २ फोटो
६. रेशीम मंडळाचा अर्जाचा नमुना

कसा मिळतो शेतकऱ्यांना लाभ ?
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत ३ वर्षासाठी तुती लागवडी व कीटक संगोपन गृह बांधकामासाठी मंजुरी मिळते. शेती सामग्रीसाठी ३ लाख ३२ हजार ७४० रुपयांचा लाभ शेतकऱयांना देण्यात येतो. कृषी विभागाच्या पोकरा योजनेअंतर्गत रेशीम शेतीसाठी लाभ देण्यात येतो.

Shares