मोत्यांची शेती करून मिळवा लाखों रुपये, संपूर्ण माहिती
पूर्वी मोती शेती म्हंटले तर समुद्रातून मोती काढावा लागत असे आता मात्र सर्व चित्र बदलले असून मधमाशीपालन, कुक्कुटपालन, मत्स्यपालन प्रमाणेच मोती शेती करता येते. तसेच यामधून अधिक नफा देखील मिळवता येतो. तर आज आपण मोती शेती बद्दल माहिती जाणून घेणार आहोत.
मोत्याची शेती हा मत्स्यपालनाचाच एक भाग आहे असे म्हणता येईल. मात्र या व्यवसायात ऑइस्टर चे पालन करावे लागते. ज्यातून महागडे असे मोती मिळतात.
एका दृष्टीकोनातून पहिले तर मोत्याची शेती करणे हे शेतकऱ्यांसाठी फायद्याचे ठरू शकते. मोत्याचे उत्पादन ही एक नैसर्गिक प्रकिया असून यामध्ये ऑइस्टर ८ ते १० महिने पाण्यामध्ये पाळले जातात.
हे ही वाचा (Read This ) एका एकरात करा या झाडाची लागवड, नक्कीच बनवेल करोडपती
मोती कसे तयार केले जातात ?
मोती ऑइस्टरमध्ये तयार होत असून हा एक नैसर्गिक रत्न आहे. ऑइस्टर म्हणजे काय तर गोगलगाईचे घर होय. गोगलगाई जेव्हा अन्न खाण्यासाठी बाहेर पडते तेव्हा नको असलेले म्हणजेच अनावश्यक परजीवी त्यांच्यासोबत चिटकून शिंपल्यात शिरतात आणि त्यापासून मुक्त होण्यासाठी गोगलगायी स्वतःवर संरक्षण कवच बनवते ते कवच नंतर मोत्याचे रूप धारण करते.
ही सर्व प्रक्रिया कृत्रिमरीत्या केली जाते तेव्हा यास मोती पालन असे म्हणतात. एका मोत्याची सरासरी किंमत ही २०० ते २००० पर्यंत असते कधी कधी मोती उच्च दर्जाचा असेल तर त्याची किंमत लाखों पर्यंत जाते.
हे ही वाचा (Read This ) या तेलबियाची लागवड करा अन् भरघोस उत्पादन मिळवा
कशी करावी मोत्याची शेती?
तुम्हाला मोत्याची शेती करायची असेल तर २० x १० आकारमानाचा तलाव असणे आवश्यक आहे. ज्याची खोली ५ ते ६ फूट असली पाहिजे. जर तुमच्या कडे अशी सुविधा नसेल तर तुम्ही घरच्या घरी प्रगत तंत्रज्ञान वापरून टाकी बसवून मोत्याची शेती करू शकता.
मोत्यांची शेती कारण्यासाठी प्रौढ ऑइस्टरची आवश्यकता असते तर तुम्हाला हे नदी, तलाव, कालवे आदी ठिकाणांवरून गोळा करता येऊ शकते. तर तुम्ही यांची खरेदी देखील करू शकता. मात्र लक्षात ठेवा त्यांपैकी एकही ऑइस्टर मेलेला नसावा.
तुम्हाला हव्या त्या मोत्याच्या आकारानुसार बी निवडावे लागते त्यानंतर बिया बिया शस्त्रक्रियेने ऑयस्टरमध्ये घातल्या जातात आणि १० दिवस नायलॉन पिशवीत ठेवून त्यांची तपासणी केली जाते. या काळामध्ये ते नैसर्गिक खांद्यावर ठेवले जातात. दरम्यान कोणतेही ऑइस्टर मरण पावल्यास त्यांना फेकून द्यावे लागते. शिंपल्यातील जीव स्वतःचे अन्न स्वतः बनवू शकत नाही त्यामुळे त्यांना बाहेरून शेणखत, केळीची साल आदी अन्न पुरवठा करावा लागतो.
मोती शेतीमधील खर्च आणि उत्पन्न
तुम्ही जेव्हा मोत्याची शेती करण्यास सुरुवात करतात तेव्हा तुम्हाला तलाव, सर्जिकल हाऊस आदी साठी एक निश्चित खर्च लागत असून हा खर्च प्रत्येक वेळी येत नाही. एकवेळचीच गुंतवणूक करावी लागते. याशिवाय तलावात वेळोवेळी खत टाकून ठेवावे लागते. तलावातील मृत शिंपले वारंवार बाहेर पडत राहतात, ज्यासाठी थोडाफार खर्च करावा लागतो.
कोणताही व्यवसाय सुरु करण्यापूर्वी त्याचे संपूर्ण प्रशिक्षण घेणे गरजेचे असते. मोती शेती कारण्यासाठी देखील तुम्ही तुमच्या जिल्ह्यातील कृषी विज्ञान केंद्राशी संपर्क साधून प्रशिक्षण घेऊ शकता.
हे ही वाचा (Read This ) कुक्कुटपालन,शेळीपालन,शेतमाल आदीसाठी ६०% अनुदान, ३१ मार्चपूर्वी असा करा अर्ज