एकाच अर्जावर मिळणार शेतकऱ्यांना सर्व योजनांचा लाभ ?
राज्याचे कृषिमंत्री शेतकऱ्यांच्या हितासाठी तसेच त्यांना अगदी सहजपणे योजनेचा , कार्यक्रमांचा लाभ घेता यावा यासाठी विविध प्रयोग केले जाते. असाच एक प्रयोग राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांच्या पुढाकाराने सुरु करण्यात आला आहे. शेतकऱ्यांना सर्व योजनांचा लाभ आता एकच अर्ज करून घेता येणार आहे. कृषी विभागाच्या महाडीबीटी पोर्टलचा हा प्रयोग यशस्वीरित्या पार पडला आहे.
प्रयोग ठरला यशस्वी…
हा प्रयोग करण्याचे जेव्हा ठरवले होते तेव्हा सुरवातीला अनेक दिवस कर्मचारी अधिकारी , शेतकरी यांना काही अडचणी आल्या होत्या. मात्र आता ९ लाख ८ जाहीर शेतकऱ्यांची पोर्टल द्वारे निवड करण्यात आली असून १९० कोटी रुपयांचा लाभ ७७ हजार शेतकऱ्यांना देण्यात आलेला आहे. त्याचबरोबर ३ लाख ३७ हजार शेतकऱ्यांना १ हजार ७१९ कोटी रुपये लाभ देण्याची प्रक्रिया टप्याटप्याने सुरु आहे, असे ककरूशी आयुक्तालयातून सांगण्यात आले आहे.
शेतकऱ्यांना होणार लाभ ?
शेतकऱ्यांना कृषी विभागामार्फत कोणत्याही योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्यांना प्रत्येक योजनेसाठी वेगवेगळा अर्ज करावा लागत असे. त्याचबरोबर त्या अर्जासोबत आधारकार्ड , सातबारा, बँक पासबुक झेरॉक्स आदी कागदपत्रे प्रत्येक अर्जासोबत जोडावे लागत होते. हे काम खूप वेळखाऊ, खर्चिक होते त्यामुळे आता महाडीबीटी पोर्टलचा निर्णय घेण्यात आला. या पोर्टल मुळे एक प्रकारची पारदर्शकता निर्माण होईल तसेच अचूकपणे निवड करता येणार असून कामात गती येईल. या पोर्टलचा चांगलाच लाभ शेतकऱ्यांना होईल.
महाडीबीटी पोर्टल..
शेतकऱ्यांना विविध योजनेसाठी अर्ज करणे सोपे जावे यासाठी कृषी मंत्रीने एक पर्याय शोधून काढला आहे. तो म्हणजे एकाच अर्जावर विविध योजनेचा लाभ घेता येणार आहे. याबद्दलची संपूर्ण माहिती , अनुदान लाभ अशी सर्व प्रक्रिया ऑनलाईन होणार असल्याने गतिमानता , पारदर्शकता निर्माण होईल असे सांगण्यात येत आहे.