लाखोंचे उत्पन्न मिळवण्याचा सुवर्ण मार्ग , जिरेनियम शेती
सुगंधी पिकास बाजारात मोठ्या संख्येने मागणी आहे. याची वाढती मागणी पाहता या पिकाची शेती केल्यास फायद्याचे ठरेल. याचा वापर तेल , साबण , डिटर्जेन्ट पावडर, कॉस्मेटिक्स मध्ये केला जातो. या पिकावर बदलत्या हवामानाचा परिणाम होत नाही. लेमन ग्रास, मेंथा, खस , जिरेनियम आदी सुगंधित पिके आहेत. यामधील जिरेनियम पिकाची बाजारात खूपच किंमत आहे. आपण वापरत असणाऱ्या सौंदर्य प्रसादनामध्ये जिरेनियम तेलाचा सर्वाधिक वापर केला जातो. भारतामध्ये परदेशातून जिरेनियम तेल मोठ्या प्रमाणात आयात केले जाते. आपण जिरेनियम पिकाची संपूर्ण माहिती जाणून घेऊयात.
जिरेनियम लागवड तंत्रज्ञान –
१. जिरेनियमचे पीक मध्यम प्रतीच्या जमिनीवर तसेच माळरानातही घेता येते.
२. जिथे ट्रॅक्टरने नांगरता येऊ शकते अश्या ठिकाणी कुठेही जिरेनियमचे पीक घेता येते.
३. जिरेनियम पिकासाठी ७५ ते ८० टक्के आद्रता लागते.
४. हे पीक २० ते ४० अंश से. तापमानात उत्तम येते.
५. या पिकाची लागवड करण्यापूर्वी जमिनीची चांगली मशागत व नांगरणी करणे अत्यंत गरजेचे आहे. कारण कमीतकमी तीन वर्ष हे पीक शेतात राहणार आहे.
६. जिरेनियम पिकाची एकदा लागवड केल्यास ३ वर्षे हे पीक उत्पादन देते.
७. प्रति एकर साधारणता १०,००० रोपे लावता येतात.
८. लागवड केल्यानंतर ४ महिन्यांनी हे पीक कापणीस तयार होते. त्यानंतर प्रत्येकी ३ महिन्यांनी या पिकाची कापणी करता येते.
९. सुरुवातीस प्रति एकरी या पिकास ७० ते ८० हजार खर्च येतो.
१०. इतर पिकाच्या तुलनेत या पिकाच्या खत व फवारणी साठी ७५ टक्के खर्च कमी येतो.
११. साधारणता ३० ते ४० किलो ऑइल प्रति एकर मिळते.
उत्पादन-
१. भारतात या तेलाची वर्षाला २०० ते ३०० टन पर्यंत मागणी असते.
२. भारतात या तेलाची १० टन पर्यंत देखील लागवड होत नाही.
उत्पन्न –
१. या पिकापासून तयार होणाऱ्या प्रति लिटर तेलास १२००० ते १२५०० रुपये मिळू शकतात.
२. सरासरी एकरी ४ ते ५ लाख रुपया पर्यंत उत्पन्न मिळते.
या पिकाची बाजारात अत्यंत मोठ्या प्रमाणात मागणी आहे. परंतु भारतात या पिकाची लागवड अतिशय कमी प्रमाणात केली जाते. या पिकास बाजार भाव जास्त आहे. भरघोस उत्पन्न मिळवण्याचा सुवर्ण मार्ग या पिकास म्हणता येईल.