लाखों रुपये कमावण्यासाठी घ्या केळी पिकाची अशी काळजी
महाराष्ट्रात केळी लागवड मोठ्या संख्येने केली जाते. केळी पिकास देशभरात भरपूर मागणी आहे.महाराष्ट्रातून जगभर केळी निर्यात केली जाते. केळी पासून विविध प्रक्रियायुक्त पदार्थ देखील बनवले जाते. केळी लागवडीमधून आपण बक्कळ पैसा कमवू शकतो. परंतु केळी पिकाची थोडी विशेष काळजी घ्यावी लागते. आपण आज केली पिकाची काय , कशी काळजी घ्यावी याची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.
केळी पिकाची काय घ्यावी काळजी –
१. जर तुम्ही रासायनिक खतांचा वापर केला असेल तर किमान २ ते ३ आठवड्यांनी जैविक खताचा वापर करावा.
२. केळीच्या मुख्य झाडाशेजारी वाढणाऱ्या फांद्या कापून टाकाव्यात. तसेच त्यावर केरोसीन २ मिली टाकावेत.
३. रोगग्रस्त झाडे, पाने दिसल्यास त्वरित त्यांना कापून नष्ट करावेत.
४. केळीचे झाड ५ महिन्यांचे झाले की त्यास प्रति झाड १५० ग्रॅम युरिया , ३०० ग्रॅम निंबोळी पेंड लावावे.
५. या पिकास खते देण्यापूर्वी बागेत तण नियंत्रण गरजेचे आहे.
६. चांगले कुजलेले शेणखत केळी पिकास दिले पाहिजे.
वरील सांगितल्याप्रमाणे केळी पिकाची काळजी घेतल्यास ह्यातून चांगले उत्पन्न्न मिळण्यास मदत होईल.