कृषीतज्ञाने दिला महत्वाचा सल्ला , असे नियोजन करून मिळवा हरभऱ्याचे भरघोस उत्पन्न
खरीप हंगामात पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.त्यामुळे सरकार रब्बी हंगामात शेतकऱ्यांना कृषी विभागाकडून बियाणांचा पुरवठा करत आहे.रब्बी हंगामातील हरभरा हे मुख्य पीक राहणार आहे दरवर्षीपेक्षा हरभरा पिकाचे उत्तम व जास्त उत्पादन मिळवण्यासाठी काय करावे याबद्दल कृषीतज्ञ पंजाबराव डख यांनी दिलेला सल्ला आपण जाणून घेऊयात.
१. बाजारातील महागडे बियाणे वापरण्या ऐवजी घरघुती बियाणे वापरलीत तर उत्पादनात वाढ होईल. लागवडी करिता ९२११ हेच बियाणे वापरावेत. महाराष्ट्रात ९२११ हे बियाणे पोषक ठरते.
२. जेवढी दाट पेरणी केली तेवढे जास्त उत्पादन होईल. त्यामुळे एकरी ४० ते ४५ किलो बियाणे जमिनीत गाढावेत.
३. एकरी डीएपी ची १ बॅग व त्याच्यासोबत ५ किलो गंधक मिसळून पेरणी केल्यास पिकाची वाढ होईल.
४. बियाणे वरच्या वर पेरले तर पिकांची उगवण क्षमता कमी होते. त्यामुळे पेरणी खोलवर करणे गरजेचे आहे.
५. पेरणीनंतर दुसऱ्या दिवशी स्प्रिंक्लरने केवळ २ तास पाणी द्यावे. पाटाने पाणी दिल्यास हरभऱ्याच्या उगवण क्षमतेमध्ये परिणाम होण्याची शक्यता आहे.
६. दुसरे पाणी २० दिवसांनी ४ तास स्प्रिंक्लरने द्यावे. तिसरे पाणी ४० दिवसांनी हरभरा फुल लागण्या अगोदर ६ तास स्प्रिंक्लरने द्यावे.
ReplyForward |