शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड करेल अडचणीत मदत
शेती ( Farming) करायची म्हंटले तर खर्च आलाच बियाणे खरेदी पासून शेतीमाल बाजारात नेऊ पर्यंत खर्च लागतोच. त्यात अवकाळी पाऊस( Rain), हवामानात ( Weather) थोडा जरी बदल झाला तर अधिकच खर्च ( Expenses) येतो. कित्तेकदा तर नव्याने सुरुवात करावी लागते आणि त्यासाठी भरपूर भांडवल लागते. अश्यावेळेस शेतकरी कर्ज ( Agriculture Loan) घेतात. शेतकऱ्यांनी खासगी सावकारी कर्ज घेतल्यास त्यांची आर्थिक पिळवणूक होते. शेतकऱ्यांची पिळवणूक होऊ नये त्यांना साहाय्य म्हणून केंद्र व राज्य सरकारने (Government) काही योजना , उपक्रम राबवले आहे. अशीच एक योजना म्हणजे किसान क्रेडिट कार्ड योजना ( KCC ). सरकारच्या या योजनेचा मुख्य उद्दिष्ट्य म्हणजे शेतकऱ्यांना कमी व्याजात तसेच अल्पमुदतीत कर्ज ( Loan) उपलब्ध करून देणे. किसान क्रेडिट कार्ड ( Kisan Credit Card) ही योजना ( Scheme) शेतकऱ्यांसाठी अधिक फायदेशीर आहे. कशी हे आपण आज जाणून घेणार आहोत.
हे ही वाचा (Read This ) शेतकरी असल्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक, असे काढा शेतकरी प्रमाणपत्र
किसान क्रेडिट कार्डचे व्याजदर
किसान क्रेडिट कार्ड हे शेतकऱ्यांसाठी फायद्याचे असून आता पर्यंत भारतामध्ये २ कोटीपेक्षा अधिक किसान क्रेडिट कार्डचे वाटप झाले आहे. शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत २ ते ४ टक्यांपर्यंत व्याजदर आकारला जातो. ४ टक्के व्याजदराने शेतकऱ्यांना ३ लाख पर्यंत सहज कर्ज उपलब्ध होते.
किसान क्रेडिट कार्डसाठी पात्रता
किसान क्रेडिट कार्डचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांचे वय हे १८ ते ७५ या दरम्यान असणे आवश्यक आहे. मात्र ६० वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त वय असेल तर त्यांना सह अर्जदार ठेवणे गरजेचे आहे.
अर्ज कसा करावा ?
किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत कर्ज काढण्यासाठी SBI च्या अधिकृत संकेस्थळावर जाणून तुमहाला शेती या पर्यायावर क्लिक करून विचारण्यात आलेली संपूर्ण माहिती भरून सबमिट बटनावर क्लिक करावे लागेल. त्यानंतर तुमच्या अर्जाची पडताळणी केली जाईल.