रोग आणि नियोजन

पिकावरील किडींवर घरघुती उपाय योजना

Shares

जर तुम्ही पिकांवरील किडी नियंत्रणात आणण्यासाठी अनेक घरागुती उपाय आहेत. त्यातील एक म्हणजे निंबोळी.कडुलिंबाच्या झाडामध्ये असलेले ‘झाडिराक्टीन’ कीटकनाशकाचे काम करते. पानांमध्ये याचे प्रमाण प्रमाणात असते तर बियांमध्ये जास्त प्रमाणात असते.मावा, अमेरिकन बोंड अळ्या, तुडतुडे पाने पोखरणाऱ्या व देठ कुरतडणाऱ्या अळ्या, कोबीवरील अळ्या, फळमाश्या, लिंबावरील फुलपाखरे, खोडकिडा आदी अनेक किडींवर याचा प्रभाव पडतो.

दुसरी पद्धत –
१. दोन किलो निंबोळ्या वाटून बारीक कराव्या.
२. त्यात १५ लिटर पाणी टाकून ते मिश्रण रात्रभर तसेच ठेवावे.
३. दुसऱ्या दिवशी त्यास नीट तलम फडक्याने गाळून घेऊन त्याची मग फवारणी करावी.
४. याद्वारे भुंगेरे, फळावरील पाने खाणाऱ्या अळ्या याचा बंदोबस्त करता येतो.

तिसरी पद्धत
१. पाच किलो निंबोळ्या ह्या बारीक करून कपड्यात बांधून ती सुमारे १२ तास पाण्याने भरलेल्या बादलीत ठेवाव्यात.
२. मग त्या काढून त्यात जरुरीप्रमाणे १०० ते २०० ग्राम साबणाचा चुरा टाकावा किंवा साबणाची पेस्ट करून त्यात मिळवावी.
३. याला चांगले ढवळून घ्यावे.
४. नंतर हे मिश्रण १०० लिटर बनेल इतके पाणी त्यात टाकावे.
५. याच्या फवारणीने हरबऱ्यावरील घाटे अळीचा बंदोबस्त करता येतो.

फवारणीची वेळ –
१. निंबोळीच्या अर्काची फवारणी संध्याकाळच्या वेळेस म्हणजे दुपारी ४ वाजे नंतर करणे योग्य असते.
२. हा तयार केलेला फवारा झाडावर कुठेही पडला तरी तो आंतरप्रवाही असल्यामुळे संपूर्ण झाडात पोहोचतो.

तर अश्या प्रकारे आपण विविध प्रकारच्या सोप्या पद्धतींचा वापर करून किडींवर प्रतिबंधात्मक उपाय करू शकतो.

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *