बैलगाडा शर्यतीला सशर्त परवानगी मिळताच खिलार बैलाच्या किमतीत वाढ
गेल्या दीड वर्षांपासून कोरोनामुळे जनावरांचा बाजार भरत नव्हता, आता परिस्तिथी पूर्वपदावर येत असून जनावरांचे बाजार भरत आहेत. नुकतीच न्यायालयाने बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवली आहे. २०१७ पासून बैलगाडा शर्यततीवर बंदी असल्याने खिल्लारी बैलाची विक्री आणि किंमत देखील कमी झाली होती. मात्र आता बैलगाडा शर्यत सुरु झाल्याने, खिल्लारी बैलाची किंमत वाढली आहे.
जातिवंत खिलारी बैलाला जास्त मागणी :-
बैलगाडा शर्यतीमध्ये खिलार बैलाला विशेष महत्व असते, त्याशिवाय बैलगाडा शर्यतीला शोभा येऊ शकत नाही. ज्या शेतकऱ्यांकडे जातिवंत खिलारी बैल आहे त्यांना २० ते ३० हजार रुपये किमतीच्या बैलांसाठी लाखो रुपये देऊन खरेदी करण्याची शेतकऱ्याची तयारी असते, जातिवंत बैलाची मागणी कोल्हापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आहे. सद्या जातिवंत बैल नाममात्र शेतकऱ्याकडे आहे. बैलगाडा शर्यतीला दिलेल्या परवानगीमुळे या जातिवंत खिलारी बैलाची मागणी वाढली आहे.
लॉकडाऊनमुळे जनावराच्या बाजारात शुकशुकाट :-
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यात लॉकडाऊन करण्यात आला होता त्याचा परिणाम संपूर्ण बाजारपेठवर झाला आहे. या लॉकडाऊनमुळे आठवडी बाजार पूर्णपणे बंद होते त्यामुळे जनावरांच्या बाजारावर देखील त्याचा परिणाम झाला आहे. तसेच शेतीसाठी वापरात येणाऱ्या यंत्राचा वापर देखील देखील वाढला आहे, यामुळे बैलाच्या बाजारावर यांचा परिणाम मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. तसेच खिलारी बैलाचे संगोपन करण्यासाठी खर्च देखील अधिक असतो यामुळे बहुतांश शेतकऱ्यांनी खिलारी बैल विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे.
शर्यतीची सुरवात, खिलारी बैलाच्या किमती दुपटीने वाढणार:-
बैलगाडा शर्यतीवर ४ वर्ष झाले बंदी होती, काल परवा बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठली आहे. यामुळे शर्यत प्रेमी कडून शर्यतीसाठी बैलाची मागणी होत आहे. बैलजोडीच्या किमतीचा विचार न करता खिलार बैलजोडी खरेदी करण्याची तयारी आहे. हि सुरवात असली तरी भविष्यात आणखी किमती वाढण्याची शक्यता असल्याचे सांगितले जात आहे.