खरीप पिकावरील खुरपडीचे व्यवस्थापण
खरीप पिकाच्या पेरणी झाल्याबरोबर खूरपडीचा प्रादुर्भाव आपल्या पिकांना रोपावस्थेत होतो. खुरपडी म्हणजे विविध प्राण्याचा एकत्रीत प्रादुर्भाव या मधे पक्षी, खार, वाणी,नाकतोडे, क्रिकेट, वायरवर्म (काळी म्हैश) इत्यादीचा समावेश होतो. हया किडी बहभक्षी असून एकदल, दिदल, दाळवर्गीय, तेलवर्गीय पिकांचर हया किडींचा प्रादुर्भाव दिसून येतो.
पेरणी झाल्यावर यांचा प्रादुर्भाव आपल्या बियाण्यास / रोपटयास होतो. पक्षी विक्षेषतः कमी ओलाव्यात बियाणे व्यवस्थित खोलीत न पडल्यास किंवा बियाणे व्यवस्थित झाकले न गेल्यास ते दाणे वेचून खातात. तर खार दाने उकरून खाते पावसाळयात सुरूवातीला वाणीचे । समुह शेतात दिसतात. वाणी रोपटयांच्या बुंध्याशी डोके खुपसून आत शिल्लक असलेला दाणा खातात. कालांतराणे अशी रोपे सुकतात वाणी ज्वारीचे मोठया प्रमाणात नुकसान करते. जमिनीवरील नाकतोडे रंगाने काळे असुन ते कमी अंतराच्या उडया मारतात व ते जमिनीतील दाने खाऊन नुकसान करतात. वायरवर्म (काळी म्हैश) ही किड कोलीओप्टेरा वर्गातील असून हिच्या अनेक प्रजाती आहेत. हया किडींचे प्रौठ (काळी म्हैश) भूरकट ते काळया रंगाचे असतात. ही किड मुख्यतः अळया (वायरवर्म) अंकूरलेली दाणे खातात. तर प्रौढ रोपटयांचा बुंधा जमिनीलगत कुरतडतात त्यामुळे पिकांचे मोठया प्रमाणावर नुकसान होते.
जमिनीतील किडीच्या प्रादुर्भावाची कारणे :
मे व जुन महिण्यात पाऊस हलका व तूरळक तसेच २०० ते २५० मि.मि. पेक्षा कमी पडल्यास जमिनीतील किडींचे (वायावर्म / वाणी) ई. जिवन चक्रास चालना मिळून त्यांचे प्रजोत्पादन झपाटयाने होते.
परंतू दोन ते तीन वेळा भारी वारंवारीतेचा पाऊस झाल्यास जमिनीत किडी दबून नष्ट होतात व प्रादुर्भावात लक्षणीय घट होते. पडीत गवताळ जमिनी प्रजोज्पादनासाठी उपयुक्त असतात. भूसभूशीत व पाण्याचा चांगला निचरा होणारी जमिन काळया म्हशीच्या वाढीस अत्यंत उपयुक्त असते. रोपावस्थेत पावसाची दिर्घ उघाड व जमिनीला भेगा पडल्यास जमिनीत राहणा-या किडींचा प्रादुर्भाव वाढतो…
सर्वेक्षण :- वायरवर्म (काळी म्हशी) या किडीसाठी पेरणीपूर्वी शेताचे सर्वेक्षण करावे किडींची संख्या जाणून घेण्यासाठी शेतातील अडम धडम प्रति एकर २० ठिकाणे निवडावी. व प्रत्येक निवडलेल्या ठिकाणची १ फूट x १ फूट x 0.५० फूट याप्रमाणे माती गोळा करावी त्यात अळया / प्रौढ ची संख्या मोजावी व २० ठिकाणीची सरासरी काढावी. किंवा वरील २० ठिकणी गव्हाच्या बियाण्याचे आमिष सापळे ठेवावे व त्या अळया / प्रौढ आढळल्यास ते मोजावे. बियाण्याचे आमिष सापळे:- गव्हाचे पिठ दिड कप+मध दोन चमच पाणी + अर्धा कप या मिश्रणाच्या गोळया तयार करून कांदे साठवण्याच्या पोत्याच्या छोटया तूकडयामधे बांधून जमिनीत वरील १० ठिकाणी झंडे लाऊन गोळया ४ ते ६ इंच खोल गाडाव्या व ४ ते ५ दिवसांनी हे आमिष किडींसाठी तपासून पाहावे. या पध्दतीमधे या किडींचा प्रादुर्भाव असल्यास त्याची माहिती मिळते व नियंत्रणाचे उपाय योजन्यास मदत होते.
व्यवस्थापणः
१. पक्षी व खारी पासून पिक वाचवण्यासाठी शेताची राखण करावी.
२. वाणीचे समूह गोळ करूण नष्ट करावे.
३. सेंद्रीस प्रदार्थ / पिकांचे अवशेष / किडींचे हंगामापूर्वी विल्हेवाट लावावी तसेच न कुजलेल्या सेंद्रीय खताचा वापर करू नये. त्यामुळे वाणी, वायरवर्म ईत्यादी प्रजोत्पादन मोठया प्रमाणावर होते.
४. नाकतोडच्या नियंत्रणासाठी धु-यावरील गवताचा वेळोवेळी नायनाट करावा व धुरे स्वच्छ ठेवावे
५. जमिनीला भेगा पडल्यास उपलब्धतेनुसार पिकास ओलीत करावे.