कमी वेळात जास्त नफा मिळवून देणारी शेळी !
अनेक शेतकरी शेतीबरोबर पशुपालन करतात. पशुपालनात शेळीपालन खूप फायदेशीर ठरते. शेळीपालनाचे योग्य व्यवस्थापन केल्यास त्यातून अधिक नफा मिळवता येतो. भारतात शेळ्यांच्या अनेक जाती आहेत. जातीप्रमाणे सर्वांचे गुणधर्म आणि वशिष्टे वेगळे आहेत. या जातींपैकी सर्वाधिक नफा मिळवून देणाऱ्या सिरोही शेळीची संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत.
सिरोही शेळी –
१. राजस्थान मध्ये शेळीची ही जात जास्त संख्येने आढळते. राजस्थानमधील सिरोही जिल्ह्यावरून याचे नाव पडले आहे.
२. या जातीच्या शेळ्या हरणासारख्या दिसतात. या शेळ्या चमकदार असतात.
३. या शेळीचे पालन शक्यतो उत्तर प्रदेशात केले जाते.
सिरोही शेळीचे वैशिष्ट्ये –
१. शेळीच्या या जातीचे संगोपन मांस व्यवसायासाठी मुख्यतः केले जाते.
२. शेळीची ही जात वेगाने वाढते. त्यामुळे हिची विक्री लवकर करता येते.
३. या जातीच्या शेळ्यांचे पालन खेड्याबरोबर शहरतातही करता येते.
४. या जातीची शेळी दररोज एक ते दीड लिटर पर्यंत दूध देते.
५. आठ महिन्यातच हिचे वजन ३० किलो होते तर एका वर्षात १०० किलो पर्यंत होते.
६. या जातीच्या शेळीपासून उत्तम मांस तयार होते.
७. या शेळ्या चारा नसल्यास धान्य खाऊ शकतात.
८. यांची खरेदी राजस्थानच्या बाजारपेठेतून करता येते.
९. यांची योग्य काळजी घेतल्यास यांची विक्री करून अधिक नफा मिळवता येतो.
शेळीपालन करणार असाल तर शेळीच्या या जातीचा नक्की विचार करावा. जेणेकरून जास्त उत्पन्न मिळवण्यास मदत होईल.