काकडी पिकावरील मुख्य रोग नियोजन
महाराष्ट्रात जवळ जवळ सर्व जिल्ह्यांमध्ये काकडी लागवड केली जाते. काकडी हे पीक मूळचे भारतीय आहे. काकडीचे भरपूर महत्व आहे. उन्हाळी व पावसाळी हंगामात काकडी लागवड केली जाते. काकडी पिकावर रोगाचा प्रादुर्भाव लवकर होतो. काही महत्वाच्या रोगांचे नियोजन कसे करावी याची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.
केवडा –
१. पानांच्या खालच्या बाजूस पिवळ्या रंगाचे ठिपके पडतात.
२. पानांच्या देठाकडे या रोगाचा प्रसार होण्यास सुरुवात होते.
३. दमट हवामानात हा रोग झपाट्याने वाढतो.
उपाय –
केवडा रोगाची लक्षणे दिसताच २५ ग्रॅम डायथेन एम ४५ हे १० लिटर पाण्यात मिसळून फवारावेत.
भुरी –
१. पानाच्या खालच्या बाजूस पिठासारखी पांढरी बुरशी येते.
२. जुन्या किंवा वाळलेल्या पानांपासून या रोगाची सुरुवात होते.
३. ढगाळ , दमट वातावरणात या रोगाची वाढ होते.
उपाय –
कॅरेथेन पाण्यात मिसळून फवारावेत. वेलवर्गीय काकडीवर कधीही गंधकाची फवारणी करू नये.
फळ कुजणे –
१. हा रोग पावसाळ्यात पसरतो.
२. फळे ओलसर जमिनीस टेकल्यास फळ कुजते.
उपाय –
शक्य होईल तितका फळांचा जमिनीशी संपर्क टाळावा. प्रतिलिटर पाण्यात २.५ ग्रॅम कॉपर ओक्सयक्लोराईड फवारणी करावी.
काकडी पिकावर उध्दभवणाऱ्या रोगाचे जास्त प्रसारण होण्यापूर्वी लक्षणे दिसताच त्वरित उपाय करावेत.