जायफळ लागवडीची पद्धत
जायफळ हे एक सदापर्णी झाड असून ते १० ते २० मीटर उंच वाढते. जायफळाची फळे चिकूच्या आकाराचे असून गुळगुळीत व पिवळसर रंगाचे असते. या फळांच्या टरफलाचा उपयोग चटणी , लोणचे मुरंबा आदी मध्ये करतात. जायफळाचा उपयोग मसाले , मिठाई , औषध , साबण , टूथपेस्ट , चॉकलेट आदी मध्ये केला जातो.
जमीन व हवामान –
१. किनारी पट्टीतील रेताड , गाळमिश्रित रेताड अश्या विविध प्रकारच्या जमिनीत जायफळाचे पीक घेता येते.
२. निचरा करणाऱ्या जमिनीत जायफळाची उत्तम लागवड होते.
३. पालापाचोळा कुजून तयार झालेली जमीन जायफळ पिकास जास्त मानवते.
४. जायफळाच्या झाडास सावलीची आवश्यकता असते. त्यामुळे हे पीक आंतरपीक म्हणून घेतले जाते.
५. जायफळ हे उष्ण कटिबंधातील पीक आहे.
६. या पिकास दमट हवामान व २५०० ते ४००० मिमी पर्यंत पाऊस मानवतो.
७. १० सें . ग्रे पेक्षा कमी तापमान या पिकास मानवात नाही.
पूर्वमशागत –
पावसाळ्यापूर्वी झाडांच्या चौफुलीवर ९० सेमी रुंद खोल खड्डे करत त्यात प्रत्येकी ५० किलो शेणखत घालावे.
लागवड –
१. जून महिन्यात या रोपाचे कलम लावून त्यांच्या भोवतालची माती घट्ट दाबून घ्यावी.
२. एक ते दोन वर्ष वयाची निरोगी , सशक्त रोपे निवडावीत.
३. कलमांचा जोड जमिनीवर राहील याची काळजी घ्यावी.
खते –
१. पहिल्या वर्षी १० किलो शेणखत , १० ग्रॅम स्फुरद , २० ग्रॅम नत्र , ५० ग्रॅम पालाश द्यावेत. ही मात्रा दरवर्षी थोडी थोडी वाढवावीत.
२. ८ ते १० वर्षांनंतर प्रत्येक झाडास ५० किलो शेणखत , ५०० ग्रॅम नत्र , २५० ग्रॅम स्फुरद , १ किलो पालाश , १.६ किलो पोटॅश द्यावेत.
काढणी –
१. जायफळाला फुले आल्यानंतर ८ ते १० महिन्यांनी फळे येतात.
२. जायफळाला वर्षभर फुले येतात.परंतु जुलै -ऑगस्ट आणि फेब्रुवारी – मार्च महिन्यात जास्त प्रमाणात काढणी केली जाते.
३. पूर्ण पक्व झालेल्या फळांचा रंग पिवळा होऊन टरफलाच्या देठाच्या विरुद्ध बाजूस तडा जातो. असे पूर्ण पक्व झालेली फळे काढावीत किंवा खाली पडलेली गोळा करून घ्यावीत.
४. जायपत्री आणि टरफल अलगद वेगळे करून ते उन्हात वाळवावेत. जायपत्री ६ ते ८ दिवसात वाळतात तर जायफळे १५ दिवसात वाळतात.
उत्पादन –
१. एका झाडापासून ५०० ते ८०० फळे मिळतात. पुढे २५ वर्षांपर्यंत उत्पन्नात वाढ होते.
२. झाड २५ वर्षाचे झाल्यांनंतर २ ते ३ हजार मिळतात.
३. ६० ते ७० वर्षापर्यंत या झाडापासून किफायतशीर असे उत्पन्न मिळते.
उत्तम उत्पन्न मिळवण्यासाठी या फळाची शेती करणे फायद्याचे ठरते.