फलोत्पादन

जांभूळाच्या शेतीमधून मिळवा भरघोस उत्पन्न

Shares

महाराष्ट्राला भारताची फळांची टोपी म्हणून ओळखले  जाते कारण महाराष्ट्रात विविध प्रकारच्या फळांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. त्या फळांवर काही प्रमाणात प्रकिया करणे भाग पडते कारण काढणीनंतर च्या चुकीच्या हाताळणीमुळे त्यांचे फार मोठ्या प्रमाणावर नुकसा  होत कधी कधी प्रक्रियेच्या सुविधा उपलब्ध नसल्याने देखील नुकसान होते .महाराष्ट्राच्या अनेक भागा मध्ये जांभुळा चे उत्पादन जास्त होते परंतु प्रक्रियाच्या सुविधा उपलब्ध नसल्यामुळे त्यांचे नुकसान मोठ्या प्रमाणत होते. यावर उपाय म्हणजे जांभुळांवर प्रक्रिया करून मूल्यवर्धित पदार्थ तयार करून व्यवस्थापन योग्य रीतीने केले पाहिजे  शेतकरी  व महिला बचत गटाने त्याची विक्री व्यवस्थापन योग्य पद्धतीने करत आहेत त्या मुळे हे फायदाचे ठरत  आहे . तसंच यातून ग्रामीण भागामध्ये रोजगार निर्मिती देखील होण्यास मदत होत आहे.तर आपण जाणून घेऊया  जांभूळ प्रक्रिये मधील संधी आणि प्रक्रियायुक्त पदार्थ याबद्दल.

जांभूळ प्रक्रियेच्या संधी.  :

जांभळाच्या झाडामध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत आणि हे फळ आहारास योग्य असे आहे  त्यामुळे बाजाराची याची मागणी मोठ्या प्रमाणत असून याचा भाव देखील चांगला आहे . ही फळे नाजूक असून १-२ दिवसांनंतर यांचा नाश होतो. त्यामुळे यांना साठवून ठेवता येत नाही .
एकाच वेळी एका फळाचे उत्पादन सगळी कडे जास्त झाले आणि ते बाजारात आले की त्याचे भाव घसरतात आणि याचा मोठ्या प्रमाणात तोटा शेतकऱ्यांना होतो . यामुळे प्रक्रियायुक्त पदार्थ जांभळापासून तयार केले तर याचा फायदा शेतकऱ्यांना होतो आणि औषधी युक्त असल्याने  विक्री ही चांगली होते .जांभूळ चा हंगाम नसतांना देखील याचा आस्वाद घेता येतो . या फळापासून बनलेल्या पदार्थांना  जसे की रस, सरबत, स्क्वॅश, सिरफ, वाईन, जेली, बर्फी टॉफी, पावडर  आणि इतर पदार्थांना  बरीच मागणी आहे.आता आपण जाणून घेऊया काही विविध प्रक्रियायुक्त पदार्थां बद्दल.

जांभळाचे स्क्वॅश :

 जांभळाच्या फळांपासून स्क्वॅश तयार करण्यासाठी प्रथम पिकलेल्या निरोगी चांगल्या फळांची निवड करून . फळे स्वच्छ पाण्याने धुवावे कारण त्यावर फवारणी केलेली असते . त्या नंतर  पल्पर च्या साह्याने त्याचा रस काढून घ्यावा. मग त्यांना एकजीव करावे .एकजीव झालेला गर स्टेनलेस स्टीलच्या पातेल्यात घेऊन 80 ते 82 अंश सेंटिग्रेड तापमानाला तीस मिनिटे गरम करावा. त्यामुळे  रस्सा मधील रंग द्रव्याचे प्रमाण जास्त मिळते. रसामध्ये साखर, सायट्रिक ऍसिड, पाणी  योग्य प्रमाणात घेऊन रसामध्ये मिसळून हे मिश्रण मलमलच्या कापडातून गाळून घ्यावे. नंतर हे मिश्रण थोडेसे गरम करून निर्जंतुक केलेल्या काचेच्या बाटलीत हवाबंद करून लेबल लावून थंड किंवा कोरड्या जागेवर साठवून ठेवावे.

जांभळाचे सरबत :

सर्वात पहिले  पिकलेली व आकाराने  मोठी  अशी जांभळे  निवडावीत. स्वच्छ पाण्याने धुतल्यानंतर त्यांचा पल्पर च्या साह्याने रस काढून घ्यावा  एकजीव झालेला गर स्टेनलेस स्टीलच्या पातेल्यात घेऊन 82 हाऊस सेंटीग्रेड तापमानाला 20 मिनिटे गरम करावा. यामुळे रस्सा मधील रंग द्रव्याचे प्रमाण जास्त मिळते. रसामध्ये साखर, सायट्रिक ऍसिड, पाणी  योग्य प्रमाणात घेऊन  रसामध्ये मिसळून ते मिश्रण मलमलच्या कापडातून गाळून घ्यावे. नंतर हे मिश्रण थोडा वेळ गरम करून निर्जंतुक केलेल्या काचेच्या बाटल्यांत भरून  हवाबंद करून लेबल लावून थंड किंवा कोरड्या जागेवर साठवून ठेवावे.

जांभळाच्या बियांचे पावडर :

जांभळाच्या फळांपासून गर व रस काढल्यानंतर राहिलेल्या बियांपासून पावडर देखील तयार करता येते. जांभूळ हे औषदियुक्त आहे आणि याची  पावडर मधुमेही रुग्णांसाठी अत्यंत गुणकारी असते. त्या पावडरला बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. गर काढून घेतल्यानंतर राहिलेल्या बिया पाण्याने स्वच्छ धुऊन घ्याव्यात. त्या बिया ट्रेमध्ये पातळ पसरून ते ट्रे ड्रायरमध्ये 55 ते 60 अंश सेंटिग्रेड तापमानास 18 ते 20 तास ठेवावेत आणि नंतर  उन्हात वाळवावे. वाळलेल्या बिया मिक्सर किंवा ग्राइंडर च्या मदतीने पावडर तयार करून पावडर चे वजन करून पॉलिथिनच्या पिशवीत भरून पिशव्या हवाबंद करून लेबल लावून कोरड्या जागी साठवून ठेवावे .

सिरफ, वाईन, जेली, बर्फी टॉफी असे अनेक पदार्थ आपण प्रकिया करून बनवू शकतो आणि यांची थोडी काळजी घेतली की ते कित्तेक दिवस नासाडी होण्या पासून वाचतात आणि वर्षभर नफा देखील करून देतात.

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *